बहुजननामा ऑनलाईन – हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील भाजपच्या माजी महिला नेत्या आणि भाजपच्या युवा मोर्चाच्या माजी पदाधिकांऱ्याचा अश्लील व्हिडीओ प्रकरणात पोलीसांनी एक महिला, मोर्चाच्या माजी पदाधिकारी आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. आपापसाच व्हिडीओ बनविणे आणि सामायिक केल्याप्रकरणी पोलीसांनी तक्रारदारासह तीन जणांना अटक केली आहे.
कुल्लूचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी या प्रकरणाची माहिती दिली. ते ही घटना मागील महिन्यात घडली आहे. या प्रकरणात एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलीसांनी पुरावे मिळवून त्यांना अटक केली आहे. यापुर्वी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून आतापर्यंत सहा जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
अश्लील व्हिडिओ बनविणे आणि तो सार्वजनिक करण्यासंदर्भात ही अटक करण्यात आली आहे. अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर दोन्ही आरोपींची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली होती. बारा मिनिटांचा हा व्हिडीओ कोणत्यातरी सरकारी विश्रामगृहात शूट करण्यात आला होता. त्यानंतर मोर्चाच्या पदाधिकाऱ्याची पत्नी आणि संबंधित महिलेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. वैद्यकीय तापासाठी अश्लील व्हिडिओ फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला होता. त्यात नष्ट करण्यात आलेले पुरावे परत मिळवून त्यांचे विश्लेषण करण्यात आले. आक्षेपार्ह व्हिडिओ बनविण्यामुळे आणि आपापसांत त्याचे सामायिकरण केल्याबद्दल आता तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.