बहुजननामा ऑनलाइन टीम – भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Khadse ) यांनी संकटमोचक नेते अशी ओळख असलेले माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Dattatray Mahajan) यांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावला आहे. जामनेरमधील दोन बस भरून भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे(Khadse ) यांच्याकडून भाजपला हादरे सुरूच आहेत.
गेल्या काही दिवसांपासून भाजपमधून राष्ट्रवादीत पदाधिकारी-कार्यकर्त्यांचं आऊटगोईंग सुरू झालं आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील भाजपचे 200 हून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे आणि एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला.
2 लक्झरी बस भरून कार्यकर्ते पक्षप्रवेशाच्या सोहळ्यासाठी दाखल झाले होते. खडसेंच्या मुक्ताईनगरच्या फार्म हाउसवर गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील भाजपच्या 200 कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यावेळी उपस्थित होत्या.
‘भाजपला ताकद दाखवून देतो’
आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल अशी गर्जना एकनाथ खडसे यांनी कालच केली होती. जळगावात भाजपेच अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. हे कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावाही त्यांनी केला होता.