मुंबई बहुजननामा : पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हि नेहमी वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असते. सगळीकडे शांतता असताना ती एखादे वादग्रस्त विधान करणार नाही ,असे क्वचितच घडेल. नुकतेच तिने भारतीय सेनेवर आक्षेपार्ह ट्विट केलं आहे. तिच्या या ट्विटमुळे लोक तिच्यावर चांगलेच भडकले आहेत, आणि लोकांनी ट्विटर वॉर सुरु केलं आहे. काही मिनिटातच तिला लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
तिने आक्षेपार्ह ट्विट करत लिहिले कि, ” काश्मीर आणि काश्मीरच्या विरुद्ध भारतीय सेनेकडून केल्या जाणाऱ्या अत्याचारासाठी ……. ” तिच्या या ट्विटमुळे लोकांनी तिची चांगलीच कानउघडणी केली आहे. काहींनी तिला भारतात मिळालेल्या प्रसिद्धी आणि पैशांबद्दल आठवण करून दिली. काहींनी तिला भारतात येण्याचा सल्ला दिला. वीणा भारत-पाकिस्तान मॅच दरम्यान झालेल्या फ़िक्सिन्ग मुळे पहिल्यांदा लाइमलाईट मध्ये आली. यानंतर ‘बिग बॉस शोमुळे तिला प्रसिद्धी मिळाली.
वीणा मलिक हि पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद असिफची एक्स गर्लफ्रेंड होती. यावेळेस भारत- पाकिस्तान मॅच फिक्ससिंग दरम्यान तिने वादग्रस्त विधान केले. यानंतर ती ‘बिग बॉस च्या चौथ्या शोमध्ये ती चांगलीच झळकली. या शोमुळे तिला फार लोकप्रियता मिळाली.