बहुजननामा ऑनलाइन- केंद्र सरकारने नुकताच जम्मू- काश्मीर ला विशेष दर्जा देणाऱ्या ३७० कलम काढून टाकून , जम्मू – काशीर राज्याला देशाचा अविभाज्य भाग बनवलं आहे. यासोबतच जम्मू -काश्मीर आणि लडाख वेगळे आहे. दोन्हींना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाचे जगभरातून स्वागत केले जात. देशात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. सोशल मीडियावर देखील या निर्णयाचे कौतुक केले जात आहे, प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.
या संबंधीचेच असेच काही ट्विट्स आपण पाहुयात
या ट्विट मध्ये काश्मीर निर्णयाबाबत पाकिस्तान आणि चीनची खिल्ली उडवली जात आहे. काश्मीरच्या विषयामुळे पाकिस्तान आणि भारताचे संबंध खूप वर्षांपासून खराब आहेत.
या निर्णयामुळे मोदी सरकारचे भरभरून कौतुक केले जात आहे. खूप साऱ्या नेटकऱ्यांनी याला बोल्ड स्टेप म्हटले आहे. तसेच “मोदी हें, तो मुमकिन हे” अश्या पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी राज्यसभेत संविधान च्या कलम ३७० हटविण्याच्या प्रस्ताव सादर केला . यानंतर राष्ट्रपतींकडून अधिसूचना लागू करण्यात आली.
नुकतेच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर मध्यस्ती दर्शवली होती. यावरून सोशल मीडिया वर ट्रम्प यांच्या संबंधित व्यंग प्रदर्शित करणारे ट्विट शेअर केले आहेत.
मोदी विरोधकांनीदेखील या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांच्या वर कौतुकाची थाप दिली आहे. एका यूजर्स ने त्याच्या पोस्ट मध्ये लिहिले कि त्यांनी कधीही मोदी सरकारच समर्थन केले नव्ह्ते , परंतु काश्मीरच्या या निर्णयामुळे माझे इथून पुढे मत हे मोदी सरकारलाच असेल.
एका व्यक्ती ने केलेल्या पोस्ट मध्ये सांगितले कि, “३७० कलम हटवण्यासाठी ६५ वर्षे लागले, परंतु इतिहासातील हि चूक आज सुधरवली आहे.” जम्मू – काश्मीरला केंद्र शासित प्रदेश म्हणून मान्यता मिळाली आहे. लडाख हा आता जम्मू – काश्मीरचा भाग न राहता वेगळा केंद्र शासित प्रदेश म्हणून दर्जा मिळाला आहे. लडाखमध्ये आता विधानसभा असणार नाही. ३७० कलमानुसार जम्मू -काश्मीर विधानसभेचा कार्यकाल हा ६ वर्षाचा होता, परंतु आता इतर राज्यांप्रमाणे इथे देखील पाच वर्षांचा कार्यकाळ असणार आहे.