बहुजननामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार वरुण धवन (Varun Dhawan) यानं बॉलिवूड अॅक्ट्रेस करीना कपूर (Kareena Kapoor) चा शो व्हॉट वुमेन वॉन्ट मध्ये उपस्थिती दाखवली होती. यावेळी वरुणनं त्याच्या लव लाईफबद्दल अनेक मोठे खुलासे केले. त्यानं सांगितलं की, कशा प्रकारे त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल (Natasha Dalal) हिनं होकार देण्याआधी 3-4 वेळी रिजेक्ट केलं होतं.
जेव्हा नताशानं वरुणला केलं होतं Reject
नताशा आणि वरुण यांचं नातं कधीच कोणापासून लपून राहिलेलं नाही. करण जोहरच्या शोमध्ये त्यांनी नात्याची कबुली दिली होती. याशिवाय दोघं अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. यावेळी करीनाच्या शोमध्ये वरुणनं कसं नताशानं त्याला 3-4 वेळ रिजेक्ट केलं होतं. हे सांगितलं आहे.
असा पडला वरुण नताशाच्या प्रेमात
वरुण म्हणाला, नताशा पहिल्यांदा 7 वी ला असताना पाहिलं होतं. दोघं 12 वी पर्यंत मित्र होते. दोघं सोबत बास्केट बॉलही खेळायचे. एकदा बास्केट बॉल कोर्टवर नताशाला चालताना पाहून तो तिच्या प्रेमात पडला.
करीना समोर मान्य केली साखरपुड्याची बाब
वरुणसोबत बोलताना करीनानं नकळत नताशाचा उल्लेख त्याची मंगेतर असा केला. यानंतर हे स्पष्ट झालं की, वरुण आणि नताशा यांचा गुपचूप साखरपुडा झाला आहे. यावेळी करीनानं त्याला लग्नाबद्दलही काही प्रश्न केले ज्यावर त्यानं भाष्य केलं.
लिव्ह इन मध्ये राहू इच्छित होता वरुण
वरुणनं सांगितलं की, त्याला नताशा सोबत लिव्ह इनमध्ये रहायचं होतं. परंतु त्यांच्या कुटुंबाची इच्छा होती की, त्यांनी लग्न करावं. कारण आता माझ्याकडे माझं घर आहे.
वरुणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो स्ट्रीट डान्सर 3 डी मध्ये झळकला आहे. लवकरच वरुण पिता डेविड धवनचा सिनेमा कुली नंबर 1 च्या रिमेकमध्येही दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत सारा अभिनेत्री अली खान प्रमुख भूमिकेत असणार आहे. हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) वर ख्रिसमस डे ला म्हणजेच 25 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.