पुणे : बहुजननामा ऑनलाईन – सातारा जिल्ह्यातील सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी सापळा रचून अटक करत त्याच्याकडून 1 पिस्तुल व 1 काडतुस जप्त करण्यात आले आहे.
आकाश भगवान त्रिभुवन (वय 25, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांना सूचना देण्यात आल्या आहेत. यादरम्यान समर्थ पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत होते. यावेळी कर्मचारी हेमंत पेरणे यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की मंगळवार पेठ परिसरात एकजण थांबला असून, त्याच्याजवळ पिस्तुल आहे. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल मोहिते, कर्मचारी निलेश साबळे, सुमित खुट्टे, सचिन पवार, सुभाष पिंगळे यांच्या पथकाने याठिकाणी सापळा रचून पकडले. त्याची चौकशी केली. तसेच झडती घेतली त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस मिळाले.