बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बिंधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. सोशलवर ती कायमच अॅक्टीव्ह असते. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर ती भाष्य करतच असते. अलीकडेच कंगनानं केंद्रीय सरंक्षण मंत्रीराजनाथ सिंह (Rajnath Singh) यांची भेट घेतली. याचे काही फोटोही तिनं सोशलवर शेअर केले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
कंगनानं तिच्या ट्विटरवरून काही फोटो शेअर केले आहेत. यात तिची बहिण आणि मॅनेजर रंगोली चंदेल (Rangoli Chandel) देखील दिसत आहे. यासोबत सिनेमाची टीमही आहे. आगामी तेजस (Tejas) या सिनेमासाठी त्यांनी राजनाथ सिंह यांची भेट घेतली आहे. फोटो शेअर करताना तिनं लिहिलं की, आज टीम तेजसनं केंद्रीय सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. आम्ही तेजसची स्क्रीप्ट भारतीय वायु सेने सोबत शेअर केली आणि यासाठी काही परवानग्या मागितल्या.
https://twitter.com/KanganaTeam/status/1338097400544710657?s=20
आगामी तेजस या सिनेमात कंगना पहिल्यांदाच एअरफोर्स पायलटच्या रोलमध्ये दिसणार आहे. सर्वेश मेवाडा या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. त्यांनीच सिनेमाची स्टोरी लिहिली आहे. रॉनी स्क्रूवाला सिनेमाची निर्मिती करत आहेत.
सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर एका धाडसी फायटर पायलटची स्टोरी या सिनेमता पहायला मिळणार आहे. इंडियन एअरफोर्सनं 2016 मध्ये महिलांना कॉम्बॅट सर्व्हीसेसमध्ये भरती करून घ्यायला सुरुवात केली होती. तेजस अशाच एका धाडसी महिला पायलचटी स्टोरी सांगत आहे.
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवी मध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.