पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महिला पत्रकार संघाच्या माजी अध्यक्षा ज्येष्ठ पत्रकार निशा पाटील -पिसे यांनी गुरुवारी रात्री नेहरुनगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कौटुंबिक कारणावरुन आलेल्या निराशेतून निशा यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
निशा पाटील पिसे या एका दैनिकात मध्ये त्या उपसंपादक म्हणून सध्या काम करीत होत्या. गुरुवारी रात्री त्या कार्यालयातील काम संपवून घरी गेल्या. त्यानंतर त्यांनी खोलीचा दरवाजा आतून बंद करुन गळफास घेतला. त्या दरवाजा उघडत नसल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांना बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.
आत्महत्या करण्यापूर्वी निशा यांनी सुसाईट नोट लिहिली असून ती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी तिचे पती प्रशांत पांडुरंग पिसे याला ताब्यात घेतले आहे. निशा यांचे भाऊ महेश शिगोटे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निशा पिसे यांच्यावर त्यांच्या पार्थिवावर जुन्नर तालुक्यातील उंब्रज या मुळ गावी शुक्रवारी सकाळी करण्यात येणार आहे.
Visit : Bahujannama.com
- ‘हे’ १० पदार्थ आहेत अतिशय उपयुक्त, शरीरातील निकोटीन होईल ‘फ्लश आऊट’! –
- उपवास करणे फायद्याचे, पण या लोकांनी करू नये, अन्यथा होईल नुकसान ! –
- ‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
- तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
- मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
- संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
- चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
- वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या –