बहुजननामा ऑनलाइन टीम – संधीवात ही एक खूप त्रास देणाऱ्या शारीरिक समस्यांपैकी एक आहे. बऱ्याच वेळा चाळीशी पार केलेल्या व्यक्तींमध्ये संधीवाताची समस्या असल्याचं दिसून येतं. त्यामुळं त्यांना चलताना, उठताना किंवा बसतान त्रास होतो. परंतु संधीवात केवळ वयस्क व्यक्तींमध्येच नाही तर किशोरवयीन मुलांमध्येही आढळतो. याला जुवेनाईल आथ्रायटीस म्हणतात.
जुवेनाईल आथ्रायटीस (Juvenile Arthritis – JA) हा एक अनुवांशिक आजार आहे. एखाद्या व्हायरसच्या संसर्गामुळं हा आजार मुलांना होऊ शकतो. या आजारात शरीर स्वत:च्याच निरोगी पेशींवर हल्ला चढवतं. परिणामी सांध्यांवर सूज येऊ लागते. आपल्या शरीरात खांदे, कोपर, मनगट, हिप्स, गुडघे इथं हाडांचे प्रमुख सांधे असतात. या सांध्यांमुळं चालणं, उठणं, बसणं, शक्य होतं. परंतु या आजारात एक सांधा जरी कमकुवत झाला तरी आपल्या शरीराची हालचाल कमी होऊ लागते. त्यातच लहान मुलांना संधीवात झाला तर त्यांची शारीरिक वाढ खुंटत जाते. त्यामुळं आज आपण यावरील काही उपचार पद्धती जाणून घेणार आहोत.
उपचार पद्धती –
1) संधीवात असल्यास हाडांची झीज होऊन असह्य वेदना होतात. या वेदना दूर करण्यासाठी आवश्यक औषधं आणि स्टेरॉईडचा वापर केला जातो. याशिवाय शरीराला पुरेसे व्हिटॅमिन मिळावे यासाठी औषधही दिली जातात.
2) पौष्टीक आहाराचं सेवन करणं.
3) हाडांची झीज होत असेल तर कॅल्शियम किंवा जीवनसत्व ड शरीराला कसे मिळेल याकडे लक्ष द्यावं.
4) नियमित फिजिओथेरपी करावी.
उपचाराचे उद्दिष्ट –
1) आजाराच्या लक्षणांवर नियंत्रण मिळवता येतं.
2) हाडांची झीज न होता तती दीर्घकाळ योग्य पद्धतीनं कार्य करतील.
3) शारीरिक वाढ आणि विकासाला प्रोत्साहन द्या.
लहान मुलांच्या संधीवातावरील अत्याधुनिक उपचारपद्धती –
1) अँटी सायटोकीन थेरपी
2) इम्युनोथेरपी
3) ट्रेल सेल थेरपी
4) एक्सोसोम्स
एक्सोसोम्स या उपचार पद्धतीमुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. त्यामुळं जुवेनाईल आर्थ्रायटीस असणाऱ्या लहान मुलांच्या उपाचारावर फायदेशीर ठरते. यामुळं मुलांच्या वेदना आणि जळजळ कमी होते. याशिवाय मुलांच्या शरीरातील ऊतींचं नुकसान होण्यापासूनही वाचवते. त्यामुळं ही उपचार पद्धत एक वरदान ठरत आहे. याव्यतिरीक्त प्रमाणित एक्सोसोम्स प्रयोगशाळेत विकसित केले जाऊ शकतात. त्यामुळं या उपचारांमुळं मुलांची आजारातून सुटका होऊन ते निरोगी आयुष्य जगू शकतात.
टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.