बहुजननामा ऑनलाइन टीम – ‘आयआयटी’सह इतर काही केंद्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय समाईक प्रवेश परीक्षा अर्थात ‘जेईई मेन्स’ (Jee mains) वर्षभरात चार सत्रात (Session) घेतली जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी ही माहिती दिली. पहिल्या सत्रातील परीक्षा फेब्रुवारी(JEE Main exam) 2021 मध्ये घेण्यात येणार असून 4 ते 5 दिवसांत निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली. (Union Education Minister Ramesh Pokhriyal Nishank)
कोरोनामुळे शैक्षणिक वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. केंद्र व राज्य सरकारांकडून घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांचाही खोळंबा झाला होता. परंतु नव्या वर्षात केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं जेईई मेन्स परीक्षेसाठी वेळापत्रक निश्चित केले आहे. जेईई मेन्स परीक्षा पुढच्या वर्षी चार सत्रात घेण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी दिली.
निशांक यांनी सांगितले की, जेईई मेन्सच्या परीक्षा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहे. पहिलं सत्र 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान घेतलं जाणार आहे. परीक्षेचा निकाल लगेच चार ते पाच दिवसांत जाहिर करण्यात येईल. असे केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी सांगितले.