बीजिंग: वृत्तसंस्था – चीनमधील सर्वात श्रीमंत माणूस आणि अली बाबाचा संस्थापक जॅक मा यांनी कोरोनव्हायरसशी लढण्यासाठी १४ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास शंभर कोटी रुपये दान केले आहेत.कोरोनाव्हायरसची लस तयार करण्यासाठी शास्त्रज्ञ हे पैसे खर्च करतील. जॅक मा फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार, हा निधी चीनी सरकारच्या दोन संशोधन संस्थांना देण्यात येणार आहे. याशिवाय हे पैसे उपचारांवरही खर्च केले जातील.
लसीवर सुरु आहे काम
जॅक मा फाउंडेशनच्या वतीने असे म्हटले आहे की लस तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदतही मोफत दिली जाईल. चीन आणि अमेरिकेचे शास्त्रज्ञ सतत कोरोनाव्हायरससाठी लस तयार करण्याचे काम करत आहेत. परंतु असे म्हणतात की लससाठी लोकांना किमान वर्षभर तरी थांबावे लागेल.
काय आहे कोरोना वायरस ?
यूएस सेंटर फॉरडिसीज कंट्रोल एंड प्रिवेंशन (सीडीएस)च्या मते, कोरोना विषाणू उंट, मांजरी आणि प्राण्यांपासून मानवी शरीरात पोहोचला आहे आणि तो प्राणघातक आहे. काही प्रकरणांमध्ये या विषाणूमुळे न्यूमोनिया देखील होऊ शकतो. या विषाणूची काही लक्षणे एमईआरएस व सार्स सारखीच आहेत.
कोरोना व्हायरचा चीनमध्ये हाहाकार
चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 170 लोक मरण पावले आहेत. चीनच्या वुहान शहरातील रुग्णालयात भीतीचे वातावरण आहे. कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या आणि जगातील अनेक देशांमध्ये आगमनानंतर आता जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमन समितीची बैठक बोलावण्यात आली आहे.