जम्मू : वृत्तसंस्था – जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर एका ऑपरेशमध्ये पोलिसांनी इस्लामिक स्टेट ऑफ फ जम्मू काश्मीरच्या एका कंमाडरला बेड्या ठोकल्या. हा कमांडर मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होता, अशी माहिती समोर आली आहे.
जम्मू विभागाचे पोलीस महानिरीक्षके मुकेश सिंह यांनी सांगितले की, केंद्रशासित प्रदेशातील इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू काश्मीरच्या एका कमांडरला अटक केली आहे. मलिक उमर ऊर्फ अब्दुल्ला याला जम्मू पोलिसांच्या विशेष ऑपरेशन टीमने जम्मू श्रीनगर महामार्गावरील झज्जर कोटली येथून अटक केली. तो दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील यारीपोरा गावाचा रहिवासी आहे. त्याच्याकडे पिस्तुल, ८ जिवंत काडतुसे आणि १ लाख १३ हजार रुपयांची रोकड आढळून आली आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत तो आयएसजेकेचा कमांडर असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी त्याला शस्त्रे आणि रोकड मिळाली होती, असे त्याने पोलिसांना सांगितले आहे.