नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया आणि मनी लॉन्ड्रींग घोटाळ्या प्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी त्यांच्या अटकेनंतर यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता इंद्राणी मुखर्जी यांनी चिदंबरम यांच्या अटकेवर आनंद व्यक्त केला आहे. चिदंबरम यांना झालेली अटक ही एक चांगली बातमी असल्याचे मुखर्जी यांनी म्हटले आहे . आयएनएक्स मीडियाचे प्रमोटर इंद्राणी मुखर्जी आणि तिचे पती पीटर मुखर्जी यांनी दिलेल्या जबाबावरच ईडी आणि सीबीआयने चिदंबरम यांच्यावर कारवाई केली. सध्या इंद्राणी ह्या मुलगी शीना बोराच्या हत्येप्रकरणी तुरूंगात आहे.
चिदंबरम यांना ३० ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. यासंदर्भात जेव्हा इंद्राणी मुखर्जी यांना विचारण्यात आले तेव्हा त्या म्हणाल्या कि, ‘मला आनंद झाला की चिदंबरम यांना अटक झाली. या प्रकरणावर माझी बारीक नजर आहे. त्याचबरोबर कार्ति चिदंबरम यांची अटकपूर्व जामीनाची याचिका देखील रद्द व्हावी, अशी माझी अपेक्षा आहे. ईडीच्या चौकशी दरम्यान इंद्राणीने सांगितल्याप्रमाणे, पीटर आणि क्रार्ति यांची भेट दिल्लीतील एका हॉटेलमध्ये झाली होती. पी.चिदंबरम यांनी FIPB च्या मंजूरीच्या बदल्यात कार्ति चिदंबरमच्या व्यवसायात मदत करावी अशी अट पीटर मुखर्जीला घातली होती. इंद्राणीच्या या जबाबावर ईडीने आरोपपत्र दाखल केले आणि कोर्टात पुरावा म्हणून सादर केला. या भेटीत कार्तिने हे प्रकरणासाठी १० लाख रुपयांची लाच मागितली होती.
१५ मार्च २००७ रोजी आयएनएक्स मीडिया ने FIPBच्या मंजूरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे अर्ज केला होता. FIPBने १८ मे २१०७ रोजी शिफारस केली होती. पण बोर्डाने आयएनएक्स मीडियाद्वारे आयएनएक्स न्यूजमध्ये अप्रत्यक्ष गुंतवणूकीला परवानगी दिली नाही. सीबीआयच्या मते आयएनएक्स मीडिया ने नियमांचे उल्लंघन करून जाणिपूर्वक आयएनएक्स न्यूजमध्ये २६ टक्के गुंतवणूक केली. इतकच नव्हे तर ८०० रुपये प्रती शेअर या हिशोबाने ३०५ कोटी गोळा केले. पण प्रत्यक्षात त्यांना 4.62 कोटी रुपयांच्या FDIची परवानगी होती.
Indrani Mukerjea, who turned approver in INX Media case, on being asked about arrest of P Chidambaram: It's good news that P Chidambaram has been arrested. (file pic) pic.twitter.com/McwrbOUZTP
— ANI (@ANI) August 29, 2019