बहुजननामा ऑनलाईन टीम – सध्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सगळी कडे तयारी सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे सुद्धा उमेदवारासाठी मुलाखती घेणे सुरु आहे. याच दरम्यान काल जळगावमध्ये मुलाखती घेण्यात आले. यामध्ये पहिल्यांदाच तृतीयपंथी महिलेने महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची मागणी केली आहे.
गेल्या १३ वर्षांपासून पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ता म्हणून जळगावमध्ये धिरज उर्फ शामिभा मिना भानुदास पाटिल (M.A, Ph. D) या काम करतात . या अंतर्गत त्यांनी आदिवासींचे वनहक्क, आरोग्य, रचनात्मक संसाधनाविषयी अनेक संघर्ष मोर्चा काढल्या. तर रावेर यावल तालुक्यातील फैजपूर आणि ग्रामीण भागातील झोपडपट्टी पुनर्वसन, रेशन हक्क या संदर्भात जनआंदोलनात्मक काम केले.
अशा या तृतीयपंथी समाजाच्या नेत्या शामिभा मीना पाटील यांनी काल मुलाखत दिली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अशोकभाऊ सोनोणे, रेखाताई ठाकूर, अण्णाराव पाटील यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी अण्णाराव पाटील म्हणाले की जर शामिभा मीना पाटील यांना उमेदवारी मिळाली तर मी स्वतः त्यांना आर्थिक मदत करणार आहे.