बहुजननामा ऑनलाईन – तमिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील सराक्कलविलाई गावातल्या एका सामान्य घरातील शेतकऱ्याचा पुत्र कैलाशवडीवू सिवन यांची कहानी आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. एक साध्या परिवारातून पालन पोषण झालेले कैलाशवडीवू सिवन हे आज इस्त्रोचे अध्यक्षपद सांभाळत आहे. यांच्या यशामागची कहाणी खूपच संघर्षमय आहे. सिवन यांनी तमिळ माध्यमातून एका सरकारी शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी नागरकोयलच्या एसटी हिंदू कॉलेजमधून महाविद्यालाचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी 1980 मध्ये मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (एमआयटी)मधून एयरोनॉटिकल इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतले. नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंसिज मधून आपले पुढचे शिक्षण पुर्ण केले.
कैलाशवडीवू सिवन यांनी २००६ मध्ये आयआयटी बॉम्बेमधून इंजिनिअरिंगमध्ये पीएडीची पदवी मिळवली. सिवन हे परिवारातील एकमेव व्यक्ती होते ज्यांनी ही पदवी मिळविली होती. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांची बहिण आणि भाऊ उच्च शिक्षण घेऊ शकले नाही. सिवन म्हणाले की, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा शेताच्या कामात वडिलांना मदत करत असायचो. त्यामुळे वडिलांनी माझे घराजवळच्या कॉलेजमध्ये नाव दाखल केले. मी बीएससीला गणितामध्ये १०० गुण मिळवले होते. त्याचवेळी माझे मन बदलले. मी कॉलेजमध्ये धोती घालून जात होतो. जेव्हा मी एमआयटीला प्रवेश केला तेव्हा पॅंट घालायला सुरुवात केली.
सिवन १९८२ मध्ये इस्त्रोमध्ये दाखल झाले. प्रत्येक रॉकेट कार्यक्रमावर सिवन यांनी काम केले. जानेवारी २०१८ मध्ये सिवन यांनी पदभार सांभाळला. त्याआधी ते विक्रम साराभाई स्पेस सेंटर (वीएसएससी) मध्ये संचालक होते. सिवन सेंटर रॉकेटची निर्मिती करत असे. त्यांनी सायक्रोजेनिक इंजिन, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि रियूसेबल लॉंन्च व्हेईकलच्या कार्यक्रमात योगदान दिल्यामुळे त्यांना रॉकेटमॅन ही म्हणले जाते. त्यांनी १५ फेब्रुवारी २०१७ ला भारताकडून १०४ उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी महत्वपुर्ण भूमिका बजावली होती. हा इस्त्रोचा विश्व रेकॉर्ड आहे. सिवन यांच्या आवडीबद्दल बोलायचे म्हणले तर त्यांनी मोकळ्या वेळेत तमिळ गाणी ऐकायला आवडतात. त्यांच्या आवडता चित्रपट ‘आराधना’ आहे.