पोलीसनामा ऑनलाइन टीम – जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अशक्य अशा गोष्टी शक्य करून दाखवता येते. अशीच एक घटना दुबईत घडली आहे. जहाजावर सुरु असलेल्या बर्थडे पार्टीतुन थेट समुद्रात एक भारतीय पडला. जहाजही तेथून निघून गेले मात्र. त्याने आपली जिद्द आणि चिकाटी सोडली नाही. त्याने स्वत:च जीव वाचवण्यासाठी स्वीमिंग सुरू केलं अन दोन तासानंतर किनाऱ्यावर पोहोचल्यावर सुटकेचा निश्वास सोडला.
इंडिया टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, २७ वर्षीय राजवीर नावाचा भारतीय तरुण आपल्या मित्राच्या बर्थडेसाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये सामील झाला होता. हि पार्टी करण्यासाठी एक Yacht भाड्याने घेतलं होतं. पार्टी सुरू असताना राजवीर पाय घसरून Yacht वरून खाली पाण्यात पडला. त्याने मदतीसाठी अनेकदा आवाज दिले. पण त्याचा काही फायदा झाला नाही. त्याचा आवाज कुणालाही ऐकू आला नाही. Yacht पुढे निघून गेलं. अशात राजवीरने विचार केला की, तो Yacht वर दिसला नाही तर त्याला शोधायला लोक येतील. पण तसं काही झालं नाही. हळूहळू अंधार वाढत होता. राजवीरने स्वीमिंग करणं योग्य समजलं. राजवीर हा काही प्रोफेशनल स्वीमर नाही. पण तरी त्याने स्वत:च जीव वाचवण्यासाठी स्वीमिंग करण्याचा निर्णय घेतला. चारही दिशेने पाणीच दिसत होते. कोणत्या दिशेने जायचं हे त्याला माहित नव्हते पण तरीही त्याने पोहायला सुरुवात केली. दोन तास पोहोल्यानंतर त्याला बुर्ज अल अरबचे लाइट्स दिसले. अन किनाऱ्यावर पोहोचताच सुटकेचा निश्वास सोडला.
यासंदर्भात बोलताना राजवीरने सांगितले की, ज्यावेळी मी जहाजातून पाण्यात पडलो तेव्हा सर्वांनां आवाज दिला पण माझा आवाज पोहोचलाच नाही. ते माझ्यापासून दूर गेले होते. मला वाटलं होतं की, कुणाच्यातरी लक्षात येईल आणि मला बघायला ते परत येतील’. पण तसे काही झाल नाही. ‘मी नेहमीच सर्वायवल शो बघत होतो. मला हे माहीत होतं की, मी सर्वाइव करणार. मी स्वत:ला हिंमत दिली आणि स्वीमिगं सुरू केलं’. अखेर किनाऱ्यावर पोहोचलो.