नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेचा कहर सुरू आहे. देशात कोरोना महामारी पसरल्यानंतर सक्रिय आकड्यांमध्ये वाढ दिसून येत आहे. संसर्गाची प्रकरणे पुन्हा एकदा वेगाने वाढू लागली आहेत. सर्वसामान्य आणि विशेष असा भेदभाव कोरोना महामारीत नसल्याने खेळाडू सुद्धा यापासून वाचताना दिसत नाही. मोठा भाऊ यूसुफ पठाणच्या नंतर आता टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इरफान पठाण सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.
इरफान पठान सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह असतो आणि त्याने स्वत: याबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे. इरफान चौथा भारतीय क्रिकेटर आहे, जो कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.
इरफान पठाणने आपल्या ट्विटरवर लिहिले आहे की, कोणतीही लक्षणे नसताना मी कोविड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळलो आहे. मी स्वत:ला आयसोलेट करत घरातच क्वारंटाईन केले आहे. मागील काही काळापासून जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांना विनंती करतो की, त्यांनी आपली कोरोना टेस्ट करावी. सर्वांनी मास्क घालावा आणि सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे. सर्वांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो.
सचिन तेंडुलकर, एस बद्रीनाथ आणि यूसुफ पठाण
यापूर्वी भारतीय फलंदाज एस बद्रीनाथने रविवारी म्हटले होते की तो कोविड-19 चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे आणि सध्या होम क्वारंटाइन आहे. तो ’रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज टूर्नामेंट’ मध्ये संक्रमित होणारा तिसरा माजी भारतीय क्रिकेटर ठरला आहे. त्याच्या अगोदर शनिवारी सचिन तेंडुलकर आणि माजी भारतीय ऑल राऊंडर यूसुफ पठाण सुद्धा कोविड-19 पॉझिटिव्ह आढळला होता.
अनेक खेळाडूंसोबत शेयर केला होता ड्रेसिंग रूम
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज छत्तीसगढची राजधानी रायपुरमध्ये खेळवण्यात आली होती. या दरम्यान 16 मार्चला ड्रेसिंग रूममध्ये इंडिया लीजेंड्सच्या खेळाडूंच्या सोबत कर्णधार सचिन तेंडुलकरने केक कापला होता. सचिनने याच दिवशी क्रिकेट करियरमध्ये 100 शतक पूर्ण केली होती. इरफान पठाण, युवराज, यूसुफ, मोहम्मद कैफ आणि प्रज्ञान ओझासह इतर खेळाडुंनी याचाच आनंद साजरा केला होता.