नवी दिल्ली :वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दमदार सुरुवात करत शानदार शतक झळकावले आहे. वर्ल्डकप स्पर्धेत शानदार फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्मा याने पाच शतके झळकावून सर्वांना धक्का दिला होता. त्यामुळे त्याच्या या कामगिरीच्या जोरावर त्याला निवड समितीने कसोटी संघात देखील सलामीला खेळण्याची संधी दिली. त्याने हि संधी सार्थ ठरवत शानदार शतकी खेळी केली.
रोहित शर्मा याने त्याच्या या शतकी खेळीत 10 चौकार आणि 4 षटकारांची आतिषबाजी केली. त्याने 154 चेंडूंमध्ये हे शतक झळकावत आपले तिसरे कसोटी शतक पूर्ण केले. सलामीवीर मयांक अगरवाल याच्या साथीने त्याने पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत 54 षटकांत 177 धावा केल्या असून मयांक अगरवाल 76 धावांवर खेळत आहे.
दरम्यान, या सामन्यात त्याने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याचा घरच्या मैदानावर सलग अर्धशतके झळकावण्याच्या विक्रमाशी देखील बरोबरी केली आहे. राहुल द्रविड याने घरच्या मैदानावर 6 पेक्षा अधिक वेळा 50 आणि त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.
Visit : bahujannama.com