नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना व्हायरसचा उद्रेक सुरुच आहे. कोरोन रुग्णांच्या संख्येत दररोज झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. राज्य सरकारांनी जारी केलेल्या आकडेवारीनुनसार गुरुवारी एकूण 1 लाख 31 हजार नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर 700 पेक्षा अधिक रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
देशातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांचा एकूण आकडा आता तब्बल 10 लाखांजवळ पोहचला आहे. सध्या हा आकडा 9.74 लाख झाला असून रुग्णवाढीचा वेग असाच सुरु राहिल्या लवकरच 10 लाखांचा टप्पा पार होण्याची शक्यता आहे. देशात कोरोनाचा सर्वाधिक कहर हा महाराष्ट्रात झाल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये दररोज 50 हजारांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण होत आहे. गुरुवारी देखील महाराष्ट्रात 56 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली, तर एकट्या मुंबईतून 9 हजार नवीन रुग्णांची भर पडली आहे. याशिवाय दिल्लीतही गुरुवारी 7500, उत्तर प्रदेशात 8 हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत.
India reports 1,31,968 new #COVID19 cases, 61,899 discharges, and 780 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry
Total cases: 1,30,60,542
Total recoveries: 1,19,13,292
Active cases: 9,79,608
Death toll: 1,67,642Total vaccination: 9,43,34,262 pic.twitter.com/Qv7eQnm5M7
— ANI (@ANI) April 9, 2021
देशात गेल्या 24 तासात 1 लाख 31 हजार 968 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 30 लाख 60 हजार 542 इतकी झाली आहे. तर 61 हजार 899 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत देशात 1 कोटी 19 लाख 13 हजार 292 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याच दरम्यान देशात 780 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 67 हजार 642 एवढी झाली आहे. सध्या देशात 9 लाख 79 हजार 608 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 9 कोटी 43 लाख 34 हजार 262 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.