नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IND Vs NZ | भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND Vs NZ) यांच्यातील तीन टी20 आणि 2 टेस्ट मॅचच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या सिरीजपासून (IND Vs NZ)टीम इंडियाच्या नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. यादरम्यान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) T20 सिरीजपूर्वी टीम इंडियाचा मास्टर प्लॅन (Master Plan) सांगितला आहे. यावेळी राहुल द्रविडने टीम इंडियाच्या अनेक गोष्टींवर भाष्य केले.
आता सध्या जिंकायचं आहे आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. येणाऱ्या मोठ्या सामन्याची देखील तयारी करायची आहे. भविष्याचा विचार करणे हे माझे काम आहे. ते प्रत्येक संघासाठी सारखेच असेल. वेगवेगळ्या प्रकारासाठी वेगवेगळा संघ (IND Vs NZ) याबाबत कुठलाही विचार केला जात नाही. परंतु, सर्व प्रकार खेळणाऱ्या खेळाडूंना योग्य विश्रांती दिली जाईल असे राहुल द्रविड म्हणाला आहे.
https://twitter.com/BCCI/status/1460628764547715079
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
संघात संतुलन असणे आवश्यक आहे. सध्या आमचे एकच लक्ष्य आहे. आम्हाला प्रत्येक सामन्यात विजय मिळवायचा आहे. आम्ही खेळाडूंच्या भविष्याचा आणि दीर्घकालीन कारकिर्दीचा विचार करू, परंतु अल्पकालीन ध्येयांसाठी, त्यांच्या चांगुलपणाकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. अशी स्पष्ट भूमिका राहुल द्रविड यांनी मांडली आहे.