नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढत असताना आता आणखी एक अस्वस्थ करणारी बातमी आली आहे. देशातील 6 राज्य – महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडु, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये 87,000 पेक्षात जास्त आरोग्य कर्मचारी कोरोना संक्रमित झाले आहेत. आतापर्यंत 573 हेल्थ वर्कर्सचा मृत्यू झाला आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडुमध्ये 28 ऑगस्टपर्यंत 1 लाखापेक्षा जास्त आरोग्य कर्मचार्यांची कोविड टेस्ट करण्यात आली.
कर्नाटकमध्ये 12,260, तमिळनाडुत 11,169 आणि महाराष्ट्रात 24,000 पेक्षा जास्त आरोग्य कर्मचारी संक्रमित आढळले आहेत. या आरोग्य कर्मचार्यांमध्ये नर्स, डॉक्टर आणि आशा कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तर मृत्यूंच्या बाबतीत महाराष्ट्रात 292, कर्नाटकात 46 आणि तमिळनाडुत 49 आरोग्य कर्मचार्यांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य कर्मचार्यांमध्ये वाढत असलेली संसर्गाची प्रकरणे केंद्रासाठी सुद्धा चिंतेची बाब बनली आहे. गुरुवारी कॅबिनेट सचिवांच्या समिक्षेत स्पष्ट निर्देश देण्यात आले की, सर्व हॉस्पीटलमध्ये आवश्यक औषधे, मास्क आणि पीपीई किटची उपलब्धता आणि त्यांच्या वापरांची देखरेख व्हावी.
सरकारला आतापर्यंत केवळ 143 क्लेम पेपर्स मिळाले आहेत, ज्याद्वारे कोरोना वॉरियर्स वीमा योजनेंतर्गत त्यांना रक्कम देता येईल. रिपोर्टनुसार अधिकृत सूत्रांनी माहिती दिली की, मृतांची प्रत्यक्ष संख्या आणि क्लेममध्ये मोठे अंतर असू शकते, कारण यापैकी अनेक अशा लोकांचा मृत्यू झाला असेल जे वीम्याचे नियम आणि कक्षत येत नाही. या सोबतच अॅप्लीकेशन्स येण्यास सुद्धा वेळ लागू शकतो, कारण मृतांचे कुटुंबिय उशीराने अर्ज करू शकतात.