मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली असतानाच आयकर विभागाने चांदिवली विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अबुल हसन खान यांच्या साकीनाका येथील कार्यालयावर छापा मारला. या कारवाईत आयकर विभागाला १ हजार १०० रुपये रोख रक्कम आढळून आली.छापा मारण्यात आला तेव्हा कार्यालयात पाच जण होते.
दिवसभर येथे चौकशी सुरू होती. या कारवाईदरम्यान आयकर विभागाला १ हजार १०० रुपयांची रोख रक्कम आढळून आली. दिवसभर घटनास्थळी चौकशी सुरू होती. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे सरचिटणीस डॉ. ए.आर. अंजारिया आणि चांदिवली येथील उमेदवार अबुल हसन खान यांनी दिली. त्यानंतर आयकर विभागाने दिवसभर आमच्या कार्यकर्त्यांची चौकशी केली, असा आरोप वंचित आघाडीकडून करण्यात आला आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेना सूडबुद्धीतून अशी कारवाई करत आहे.
Visit : bahujannama.com