भोकर : (प्रतिनिधी) बहुजननामा ऑनलाईन – १६-नांदेड लोकसभा मतदार संघात काँग्रेस, भाजपा, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारा सोबत समाजवादी पार्टी व बसपा युतीचा देखील उमेदवार आहे . नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एम.आय.एम.पार्टीची ओळख करून देणारे सय्यद मोईन यांनी एम.आय.एम.सोडून समाजवादी पार्टी मध्ये नुकताच प्रवेश केला त्यांनी समाजवादी पार्टी ची धुरा अबू असीम अजमी यांनी सय्यद मोईन यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राची कार्याध्यक्ष पद देऊन धुरा त्यांच्या कडे दिली त्यांनी नांदेड मध्ये स्वतः निवडणूक न लढवता अब्दुल समद अब्दुल करीम यांना उमेदवारी दिली.आज नांदेड जिल्ह्यात मतदारांचे हाल काय आहेत,काँग्रेस सरकाने ,मुस्लिम समाजावर भाजपा प्रमाणेच अन्याय केला आहे म्हणून अखिलेश यादव व मायावती यांनी युती करून उमेदवार उभा केले आहेत याचा फायदा नांदेड जिल्ह्यात नक्की होईल असे समाजवादी पार्टीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष म.अल्ताफ यांनी केले.
काँग्रेसची व भाजपा च्या उमेदवाराची हार नक्की होणार आहे.
अब्दुल समद हे लोकसभासाठी सर्व परिचित सपा व बसपा चे उमेदवार असून त्यांचा विजय नक्की होणार असल्याचे यावेळी कार्यकर्त्याच्या तोंडून ऐकायला मिळाले आहे.अनेक भागात भोकर शहरात जिल्हाअध्यक्ष म.अल्ताफ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते गल्ली बोळात उमेरवारांचा फोटो असलेले पोम्लेट वाटताना दिसले. भोकर शहरात काही दिवसात अब्बु आझमी यांची जाहीर सभा होणार असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले आहे. त्यामुळे विजय आमचाच नक्की राहील दुसऱ्या पक्षाचे देखील उमेदवार राजकीय अनुभवी असल्याने लोकांची जास्तीत जास्त पसंती सपा बसपा उमेदवारास दिली असल्याने चित्र भोकर शहरात दिसले आहे या बैठकीत तालुका अध्यक्ष करीम करखेलिकर, शेख नझीर, मिलिंद गायकवाड,कामरान शेख ,मोसीन सोनार, जुनेद भाई,तसेच भोकर शहरातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.