बहुजननामा ऑनलाइन टीम – जब वी मेट, रॉकस्टार आणि लव आजकल अशा सिनेमांचं डायरेक्शन करणारे 49 वर्षीय इम्तियाज अली (Imtiaz Ali) यांनी घोषणा केली आहे की, ते जम्मू काश्मीरमधील युवकांसाठी स्थानिक स्तरावर वर्कशॉप आयोजित करणार आहे. जेणेकरून तरुणांना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी संधी मिळेल. त्यांचं म्हणणं आहे की, जम्मू काश्मीरमध्ये सकारात्मक कुटून कुटून भरली आहे. त्यांचे क्रिएटीव्ह स्किल्सही बेमिसाल आहेत. यासाठी त्यांनी जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा (Manoj Sinha) यांची भेट घेतली आहे.
इम्तियाज अली यांनी पत्रकारांना सांगितलं की, हे वर्कशॉप संगीतकार, नर्तक, गायक, शिल्पकारांसाठी असेल. यासोबत स्थानिक वाद्य यंत्रांवर खास लक्ष दिलं जाणार आहे. इथं प्रतिभेची कमी नाहीये. मी खूप अपेक्षेनं इथं आलो आहे.
पुढं बोलताना ते म्हणाले, त्यांना विश्वास आहे की, जुन्या, पारंपरिक लोकसाहित्यात बऱ्याच अशा कथा आहेत ज्यांना सिनेमात रुपांतरीत केलं जाऊ शकतं. आपली क्षमता जगाला दाखवण्यासाठी तरुणांनी पुढं यायला पाहिजे.
इम्तियाज यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ते राधा कृष्णावर एक सिनेमा बनवणार आहेत. राधा-कृष्णाच्या शाश्वत प्रेम कहानीवर आधारीत ते स्क्रीप्ट लिहिणार आहेत. खुद्द तेच याचं डायरेक्शन करणार आहेत.