धुळे : बहुजननामा ऑनलाईन – धनगर समजाला एस.टी.आरक्षणाची अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांसाठी युवा मल्हार सेनेतर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी धनगर समाज सन १९८० पासून संघर्ष करीत आहे. परंतु, वेळोवेळी आंदोलने, निवेदने देऊनही राज्य शासनाने दखल घेतलेली नाही.
त्यामुळे समाजात शासनाविषयी रोष आहे. तरी महाराष्ट्रातील धनगर समाजबांधवांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देऊन अंमलबजावणी करावी. तसेच सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर प्रदेश उपाध्यक्ष विनोद खेमनार, जिल्हाध्यक्ष मनोज कोळेकर, उपजिल्हाध्यक्ष मनोज पिसे, सागर शेळके, अनिल खेमनार, बबलू गरदरे, आकाश शिंदे, शिवदास कारंडे, सुनील बच्छाव, नामदेव चोपडे, बबलू खेमनार, नितीन सोनवणे, विशाल शिंदे, प्रकाश खरात, भालचंद्र बनगर, पवन महानोर, अरुणा पारखे, भगवान थोरात आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.