मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मागील आठवड्यापासून मुंबई शहरासह उपनगरात पावसानं (Heavy Rainfall) अशरश: कहर केला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील (Mumbai Rain) अनेक रस्ते जलमय झाले आहेत. आज मुंबई, ठाणे, रायगड (Raigad) आणि रत्नागिरी (Ratnagiri) पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरु असून पुढील तीन ते चार तास रेड अलर्ट (IMD Red alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन हवामान विभागाकडून (IMD alert) करण्यात आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Entire belt of Konkan and adjoining ghat areas of Madhya Maharashtra very likely to receive heavy to very heavy rainfall with possibility of extremely heavy falls at isolated places. Thane and Raigad very likely to continue with intense to very intense spells during next 3-4 hrs pic.twitter.com/gE10YgIqoI
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 19, 2021
घाटमाथा परिसरात ढगांची दाटी
संपूर्ण कोकण किनारपट्टी (Konkan coast) आणि मध्य महाराष्ट्राच्या (Central Maharashtra) घाट माथ्याच्या परिसरात ढगांची दाटी अद्यापही कायम आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे, असं ट्विट भारतीय हवामान विभागानं केलं आहे. याशिवाय 19 ते 23 जुलै या कालावधीत राज्यात विविध ठिकाणी रेड व ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला आहे.
राज्यात रेड व ओरेजं इशारे
Severe weather warnings by IMD today for Maharashtra for 19-23 Jul.
Entire Konkan & parts of madhya Mah r on Red Alert today. D2,3 Orange alert issued
Parts of marathwada,Vidarbha r likely to covered with Yellow alert during period.
Watch IMD updates pl. pic.twitter.com/DaYND84h2w— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 19, 2021
या भागात आज रेड अलर्ट
संपूर्ण कोकण किनारपट्टी, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड या भागात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्या, परवा या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवाडा, विदर्भात याच कालावधीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Web Title :- IMD Alert | red alert next three four hours heavy rains mumbai thane raigad ratnagiri in maharashtra
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Central Universities CET | UGC ची मोठी घोषणा ! केंद्रीय विद्यापीठांमधील सीईटी परीक्षा रद्द
Aurangabad Crime | लष्करी छावणीतील झाडाला गळफास घेत जवानाची आत्महत्या; प्रचंड खळबळ
Google Chrome चा वापर करणार्यांनी व्हावे सावध, ताबडतोब करा हे काम अन्यथा होईल मोठे नुकसान