नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI News | स्टेट बँक ऑफ इंडियाने (State bank of India) मुलांसाठी ऑनलाइन खाते उघडण्याची सुविधा दिली आहे. ही सुविधा केवळ अल्पवयीन मुलांना लक्षात ठेवून सुरू केली आहे. सुविधेचे नाव पहला कदम-पहली उडान (Pehla Kadam, Pehli Udaan) ठेवले आहे. यामध्ये SBI बँक मुलांना खाते उघडण्याची सुविधा देईल. यासोबतच मुलांच्या नावाने खाते उघडल्यावर एटीएमची सुविधा मिळेल. मोबाइल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग सुविधा सुद्धा मिळेल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
1. Pehla Kadam Saving Account
– कोणत्याही वयाच्या अल्पवयीन मुलाच्या नावावर आई-वडिल किंवा गार्डियन जॉईंट अकाऊंट उघडू शकतात.
– ते पॅरेंट किंवा गार्डियन किंवा मुल स्वता सिंगल प्रकारे ऑपरेट करू शकते.
– हे कार्ड अल्पवयीन आणि पालकांच्या नावाने जारी केले जाईल.
पहला कदम सेव्हिंग अकाऊंटचे फायदे
मोबाइल बँकिंग सुविधा, 2000 रुपयांपर्यंत रोज ट्रांजक्शन लिमिट, ATM-डेबिट कार्ड सुविधा, 5,000 रुपयांपर्यंत पैसे काढणे, इंटरनेट बँकिंग रोज 5,000 रु. लिमिट, सर्व बिल भरणे, पॅरेंट्ससाठी पर्सनल अॅक्सीडेंट इंश्युरन्स कव्हर सुद्धा मिळते.
IMD Alert | मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीत मुसळधार पाऊस, पुढील चार दिवस ‘रेड अलर्ट’ !
2. Pehli Udaan Saving Account
– हे खाते 10 वर्षापेक्षा जास्त वयाची मुले जी आपली सही करू शकतात ती पहिली उडान अंतर्गत खाते उघडू शकतात.
– अकाऊंट पूर्णपणे अल्पवयीनच्या नावे असेल.
– हे खात ते एकटे ऑपरेट करू शकतात.
कसे उघडायचे खाते –
– अगोदर एसबीआयची ऑफिशियल वेबसाइट sbi.co.in वर जा. यानंतर पर्सनल बँकिंगवर क्लिक करा.
– आता अकाऊंट टॅबवर क्लिक करून सेव्हिंग अकाऊंट ऑफ मायनर्सचा पर्याय निवडा.
– यानंतर अप्लाय नाऊवर क्लिक करा. नंतर तुम्हाला डिजिटल आणि इन्स्टा सेव्हिंग अकाऊंटचे एक पॉप-अप फिचर्स दिसेल.
– आता Open a Digital Account च्या टॅबमध्ये क्लिक करा.
– यानंतर Apply now वर क्लिक करून पुढील पेजवर जा.
– अकाऊंट ओपन करण्यासाठी आपली पूर्ण माहिती नोंदवा.
– ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकदा SBI च्या ब्रँचमध्ये जाणे आवश्यक आहे.
– याशिवाय ऑफलाइन पद्धतीने एसबीआय ब्रँचमध्ये जाऊन सुद्धा अकाऊंट उघडू शकता.
Web Title : sbi pehla kadam pehli udaan saving accounts for children know about it here in details
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Central Universities CET | UGC ची मोठी घोषणा ! केंद्रीय विद्यापीठांमधील सीईटी परीक्षा रद्द