बहुजननामा ऑनलाइन टीम – रस्त्यावर (Street) किंवा कोणत्याही सार्वजनिक (public Space) ठिकाणी थुंकणे (Spit) हे कोणत्याही साथीच्या आजाराचे उगमस्थान आहे. नेमके त्याकडेच सर्व संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होतं. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थुंकण्याच्या सवयीकडे सामाजिक गुन्हा म्हणून पाहिला जात आहे. कोरोनासारख्या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वयंशिस्तने स्वच्छता पाळण्याची सवय लागावी यासाठी प्रशासनाकडून उपाय योजना केल्या जात आहे. नाशिक महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी व मुख्यत्वे रस्त्यावर थुंकणाऱ्यां विरोधात दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे.
कोरोनामुळे सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व वाढल्याने महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर थंडात्मक कारवाई केली आहेच. आता सार्वजनिक सेवेची शिक्षा देखील केली जात आहे. मागील आठ महिन्यात 67 जणांकडून प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसुलीसह रस्त्यांची साफई करणे व मास्क परिधान करण्यासाठी प्रबोधन करण्यात आले आहे. आतापर्यंत पालिकेने 62 हजार 800 रुपयांचा दंड वसुल केला आहे. तसेच दंडासोबतच सार्वजनिक सेवा करावी लागत असल्याने याचा परिणाम झाला असल्याचा दावा नाशिक आरोग्य विभागाने केला आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा गुन्हा असला तरी या नियमाचे पालन करताना कोणी दिसत नाही. मात्र, कोरोनामुळे याला महत्त्व प्राप्त झाले असून मुंबई पालिकेने यावर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. एका पेक्षा अधिक वेळा सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळला तर त्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणची सेवा करण्याची कारवाई सुरु केली. याच धर्तीवर नाशिक महापालिका हद्दीमध्ये देखील महापालिकेने कारवाई करताना दंडात्मक कारवाई बरोबरच सार्वजनिक स्वच्छतेची शिक्षा सुरु केली आहे.
अशी आहे शिक्षा
पहिला गुन्हा – 1 हजार रुपये दंड आणि एक दिवस सार्वजनिक सेवा
दुसरा गुन्हा – 3 हजार रुपये दंड आणि तीन दिवस सार्वजनिक सेवा
तिसरा गुन्हा – 5 हजार रुपये दंड आणि पाच दिवस सार्वजनिक सेवा