नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – अल्पसंख्या असलेल्या कासार समाजाला भटके विमुक्त ‘ब’ आरक्षणामध्ये समावेश करण्यासाठी शासन दरबारी कासार समाजाचे म्हणणे मांडून त्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.नांदगाव येथील स्व. शेट जगन्नाथ ताराचंद कासलिवाल धर्मशाळेत जागतिक कासार समाज फाउंडेशनतर्फे आयोजित पहिल्या राष्ट्रीय महाअधिवेशनात ते बोलत होते.
व्यासपीठावर आ. पंकज भुजबळ, आ. उन्मेष पाटील, माजी आ. अनिल आहेर, संजय पवार, बापूसाहेब कवडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे, भावराव निकम, किरण देवरे, दत्तराज छाजेड, प्रभाकर शिरापुरे, भाऊ कुंभकर्ण, मीरा गाडेकर, रोहिदास गाडेकर, संजय कासार, अशोक दगडे, मधुकर रासने, संतोष भुजबळ, हेमलता तंटक, कल्याणी रांगोळे, सौरभ कोळपकर, अनिल अष्टेकर, संदीप चिमटे, देवेंद्र शेटे, कचेश्वर कुंभकर्ण आदी उपस्थित होते.महाजन म्हणाले, कासार समाज अतिशय अल्पसंख्य आणि विखुरलेला आहे. त्यांच्या रास्त असलेल्या आरक्षणाच्या मागणीसाठी मी स्वत: मुख्यमंर्त्यांशी बोलेन व विधिमंडळातही तुम्हाला भटके विमुक्त – ब आरक्षण मिळावे, यासाठी आवाज उठवेन, अशी ग्वाही ना. महाजन यांनी दिली. समाजाचे आर्थिक व अन्य प्रश्न या अधिवेशनाच्या माध्यमातून मार्गी लागतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या वेळी आ. भुजबळ यांनी आपल्या मनोगतातून कासार समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, अशी ग्वाही दिली. आ. पाटील, आ. दराडे आदींनीही मनोगत व्यक्त केले.अधिवेशनास राज्यभरातील विविध ठिकाणांहून सुमारे साडेतीन ते चार हजार कासार समाज बांधव उपस्थित होते.
अधिवेशन यशस्वीतेसाठी देवेंद्र शेटे, काशीनाथ रावअंदोरे, मधुकर रावअंदोरे, दत्तात्रय शेटे, सुधाकर रावअंदोरे, अरविंद रावअंदोरे, भास्कर सातपुते, सुभाष खांडगौरे, योगेश वडगावकर, अतुल शेटे, तुषार रावअंदोरे, सुहास शेटे, सुमित शेटे, नरेंद्र रावअंदोरे, निखिल रांगोळे, उमेश रावअंदोरे, कैलास रावअंदोरे, संतोष तांबटकर, गोपीनाथ रावअंदोरे, नीलेश रावअंदोरे, अक्षय रावअंदोरे, नीलेश वडगावकर, सुनील रावअंदोरे, सुनील बाविस्कर, सुनील कुंभकर्ण, अथर्व शेटे, अजय रावअंदोरे, विनोद रावअंदोरे, तेजस रावअंदोरे आदींनी परिश्रम घेतले.