लखनऊ: बहुजननामा ऑनलाइन – भविष्यातील कोणत्याही निवडणुकीत भाजपबरोबर युती करणार नाही, तशी वेळ आली तर राजकारणातून सन्यास घेईन, असे बहुजन पक्षाच्या प्रमुख मायावती (mayawati) यांनी म्हंटले आहे. उत्तर प्रदेशमधील आगामी विधानपरिषद निवडणुकांत समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्याची ताकद असणाऱ्या कोणत्याही पक्षाला किंबहुना भाजपलाही पाठिंबा देऊ असे वक्तव्य मायावती(mayawati) यांनी गेल्या आठवड्यात केले होते.
मुस्लिम मतदारांनी बसपपासून दूर जावे म्हणून काँग्रेस आणि समाजवादी पक्ष माझ्या वक्तव्याचा विपर्यास करत आहेत. भाजप आणि बसपची विचारसरणी परस्परविरोधी आहे. त्यामुळे आम्ही भाजपबरोबर युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बसप सर्वच धर्मातील लोकांचा विचार करणारा पक्ष आहे असे मायावती यांनी म्हंटले आहे.