मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील अतिशय संवेदनशील राजकीय आणि सामाजिक मुद्दा असलेल्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला आहे. आरक्षण रद्द झाल्यानंतर खासदार संभाजीराजेंनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis ) यांच्यासह राज्यातील विविध राजकीय नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेत आहेत. याबाबत देवेंद्र फडणवीसांना(Devendra Fadnavis ) प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर फडवणीस म्हणाले की, मी संभाजीराजेंना इतकंच सांगितलं की, आम्ही मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी कोणासोबतही बैठकीत चर्चेला बसायला तयार आहोत. मी केवळ एक सूचना केली. समोरच्यांनी राजकारण करु नये, एवढच समोरच्यांनाही सांगावे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासंबंधी नुकतीच वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचीही पुण्यात भेट घेतली. संभाजीराजेंच्या या भूमिकेबद्दल फडणवीस यांनी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर फडणवीस यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेचे स्वागत केले. संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी राज्यातील सर्व नेत्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आम्ही त्यांच्यासोबतच असल्याचे फडणवीस म्हणाले. मराठा आरक्षणासाठी आम्ही त्यांच्यासोबत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. संभाजीराजे छत्रपती सध्या आरक्षणासाठी राज्यभरातील वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्यात काहीही गैर नाही. ते मलादेखील भेटले होते. या प्रश्नावर सर्वच पक्षांनी एकत्र यायला हवे, अशी त्यांची भूमिका आहे, आमची त्यास तयारी असल्याचे फडणवीस म्हणाले.
नाशिककरांसाठी मोठी बातमी ! Lockdown ‘शिथिल’
दिलासादायक ! कोरोना उपचारासाठी ‘या’ बॅंका देणार 5 लाखांचे वैयक्तिक कर्ज, जाणून घ्या
उद्योगपती आनंद महिंद्रांनी CM ठाकरेंच्या वाढीव Lockdown च्या निर्णयाचं टाळ्या वाजवून केलं ‘कौतुक’