बहुजननामा ऑनलाइन टीम – हैदराबादमध्ये २७ वर्षाच्या डॉक्टरवर बलात्कार करुन तिला जाळून मारणाऱ्या नराधमांचे आज पोलिसांनी एन्काऊंटर केले. समजात पोलिसांच्या या कार्याचा सन्मान होत आहे. अनेकजण आपआपल्या प्रतिक्रिया देत आहे. या संदर्भात राजकीय नेत्यांकडूनही बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
माजी मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांनीही या प्रकारावर भाष्य केले आहे. फडणवीस म्हणाले की, ‘एन्काऊंटर झाल्यामुळे त्यासंदर्भात लोकांमध्ये तीव्र भावना पहायला मिळत आहे. बलात्कारांना शिक्षा झालीच पाहीजे असे लोकांचे मत आहे. माझ्याजवळ त्यासंदर्भातील जास्त माहिती नाही. त्यामुळे मी अधिक काही बोलणार नाही. पण बलात्कारांना मृत्यूदंड व्हायला हवा मात्र तो कायद्याने मिळायला हवा.’
हैदराबाद बलात्कार पीडितेचा जळालेला मृतदेहाचे फोटो पाहून संपुर्ण देश हादरला होता. याप्रकरणी सारबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, तसेत आरोपींना अटक करण्यात आली होती. पीडितेच्या हत्येप्रकरणी पोस्ट मॉर्टिम अहवालातून धक्कादायक खुलासे समोर आले होते.
प्राथमिक माहितीनुसार 4 जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला होता, त्यावेळी जवळपास 7 तास पीडितेला बांधून ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पीडितेवर अत्याचार करण्यात आले. या चौघांनी प्रियंकाला टॉर्चर केल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं असून, ट्रक ड्रायव्हरांसह त्यांच्या क्लिनर्सनी पीडितेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे.