नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तेलंगानाची राजधानी हैद्राबाद येथे महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर आणि जिवंत जाळण्याच्या प्रकरणात कोर्टाने सर्व आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडीत आरोपींनी या प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या या गुन्ह्यातील मुख्य आरोपीने सांगितले आहे की, जेव्हा चार आरोपी महिला डॉक्टर मृत आहे समजून जाळत होते, त्यावेळी ती जिवंत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी मोहम्मद पाशा यांनी सांगितले की, सामूहिक बलात्कारानंतर महिलेने पळून जाऊ नये, म्हणून त्यांनी तिचे हात पाय बांधले. या चौघांनीही बलात्कारानंतरही पीडितेला मद्यपान करण्यास भाग पाडले. जेव्हा ती बेशुद्ध पडली तेव्हा त्यांनी तिला एका लॉरीमध्ये टाकून पुलाखाली घेऊन गेले. यानंतर पीडितेला पुलाखाली पेट्रोल टाकून जाळण्यात आले. आरोपींनी सांगितले की, त्यांना वाटले की ही महिला मरण पावली आहे, परंतु त्यांनी आग लावली तेव्हा तिने ओरडण्यास सुरवात केली. पोलिसांना कळू नये म्हणून त्यांनी महिलेला जाळून टाकले.
दरम्यान, २९ नोव्हेंबरला हैदराबादमधील सायबरबाद टोल प्लाझाजवळ एका महिलेचा अर्ध मृतदेह आढळला. महिलेची ओळख पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून पटली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सामूहिक बलात्कारानंतर महिलेची हत्या करण्यात आली होती, त्यानंतर मृतदेहावर पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आले. मोहम्मद पाशा, नवीन, चिंताकुंता केशवुलू आणि शिवा अशी या चौघांची नावे आहेत. पोलिस तपासात उघडकीस आले आहे की, आरोपींनी महिला डॉक्टरला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तिच्या स्कुटीची हवा काढून टाकली होती. पोलिसांनी सांगितले की, चार आरोपींनी टोल प्लाझाजवळ महिलेला स्कूटी पार्क करताना पाहिले होते. तेवढ्यातच एका आरोपी शिवने तिच्या स्कूटीची हवा काढली. जेव्हा महिला डॉक्टर तिच्या बहिणीसोबत फोनवर बोलत होती. तेव्हा आरोपी चिंताकौंता केशवुलू आणि शिवा मदतीसाठी तेथे पोहोचले. उर्वरित आरोपीनि तिला मदत करण्याच्या बहाण्याने तिला दूर नेले आणि बांधून ठेवले.
Visit : bahujannama.com