बहुजननामा ऑनलाइन टीम – अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे आदर्श कपल मानलं जातं. या दोघांनी गुरुवारी एक फोटो शेअर करत चाहत्यांना गोड बातमी दिली, आणि जानेवारी 2021 मध्ये नवा पाहुणा घरी येणार असल्याचे सांगितले. या दोघांनी 2017 मध्ये ईटलीत मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केलं. त्यानंतर त्यांच्या घरात पाळणा हालणार असल्याच्या अनेकदा चर्चा उठल्या. मात्र, गुरुवारी या दोघांनी अधिकृतपणे आपल्या घरी पाहुणा येणार असल्याचे जाहीर केलं.
या दोघांनी ट्विट करुन आपल्याकडे असलेली गोड बातमी चाहत्यांना देताना म्हटले कि, आम्ही दोनाचे तीन झालोय असं ट्विट करत त्यांनी गोड बातमी दिली. जानेवारी 2021 मध्ये घरी पाळणा हालणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. यानंतर विराट कोहली IPL साठी दुबईत दाखल झाला. पण, त्याच्यासोबत पत्नी अनुष्काही दुबईत दाखल झाली आहे.
https://twitter.com/imVkohli/status/1298856026544906240
अनुष्का आणि विराट कोहली यांनी दुबईत रॉयल चँलेंजर्स बंगळुरूच्या सदस्यांसोबत हा आनंद साजरा केला. या दोघांनी केक कापून सर्वांना पार्टी दिली. यावेळी विराट सफेद टी-शर्टमध्ये होता, तर अनुष्कानं सर्वांचे लक्ष वेधले. ब्लॅक अँड व्हाईट डॉट्सचा पोल्का ड्रेस घातला होता. लॉस एंजिलीसच्या निकोलास यांनी डिझाईन केलेल्या या ड्रेसची किंमत तब्बल 45 हजार रुपये आहे.
https://twitter.com/AnushkaSFanCIub/status/1299555450669522944
‘गुड न्युज’नं नोंदवला विक्रम, जगात ठरले अव्वल
विराट-अनुष्कानच्या गुड न्युजच्या इंस्टाग्राम पोस्टवर 24 तासात 15.3 मिलियन लाईक्सचा पाऊस पडला आहे. गोड बातमी दिल्यानंतर सर्वाधिक लाईक्स मिळवणारे ते जगातील अव्वल कपल ठरले आहे. यापूर्वी हा विक्रम अमेरिकन मॉडेल गिगी हँडीग हीच्या प्रेग्नीच्या न्युज पोस्टला 8.2 मिलियन लाइक्स मिळाले होते. तर जस्टीन बिबरच्या साखरपुड्याच्या पोस्टवर 13.4 मिलियन लाईक्स होते.