नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पहिले असलेला कोरोना व्हायरसचे संकट सरत नाही तेच आता नवीन कोरोना व्हायरस SARS-CoV- 2 वेगाने पसरत आहे. सीडीसीनुसार हा नवीन व्हायरस एक-दुसऱ्याच्या संपर्कात आल्याने पसरत असून यासाठी लोकांना आपल्यापासून ६ फूट अंतर ठेवले पाहिजे. कोरोना व्हायरस COVID-19 ची सुरुवात कफ आणि शिंकेमुळे होते. प्रभावित व्यक्ती अनेक शिंका देते. त्यामुळे बाजूला असलेल्या लोकांनाही कोरोना व्हायरस घेरू शकतो. पण चांगली गोष्ट ही आहे की, नवीन व्हायरस इतर व्हायरससारखा संक्रमक नाही.
ज्या ठिकाणी व्हायरस होण्याची शक्यता आहे तिथे जाऊन तोंड, नाक आणि डोळे झाकले तरी पसरू शकतो. तथापि सीडीसीचे अधिकारी या प्रकारचे ट्रान्समिशन होण्याची शक्यात कमी असल्याचे मानतात. काही कोरोना व्हायरसारखे अनेक दिवसापर्यंत सक्रिय राहतात. पण या नवीन कोरोना व्हायरस किती दिवस राहील, याची काही माहिती मिळालेली नाही. पण या व्हायरसला इथेनॉल, हायड्रोजन-पेरोक्सईड या ब्लिचपासून बनवलेल्या क्लिनरने मारले जाऊ शकते.
साधारण विषाणू ड्रॉपलेट्समुळे हवेत दीर्घ वेळेपर्यंत राहतात. पण हा व्हायरस हवेत जास्त वेळ टिकू शकत नाही. उदा. चेचकचे जंतू अनेक तास हवेमध्ये राहू शकतात, परंतु SARS-CoV-2 बाबतीत असे होत नाही. याचे प्रमाण कमी असून नवीन कोरोना व्हायरस विष्ठेमुळेही पसरू शकतो. एका अभ्यासानुसार COVID-19 ने पीडित व्यक्तींच्या विष्ठेच्या सॅम्पलमध्ये मायक्रोस्कोपपासून जीव्य् जंतूंचे सूक्ष्म कण दिसले आहेत.
चीनने आपल्या अहवालात लिहिले आहे की, याचा अर्थ विष्ठेचे नमुना हात, जेवण, पाणी इत्यादीना दूषित करू शकतो. उदा, जर एखादया संक्रमित मलच्या अवशेषांच्या दूषित जागेला स्पर्श करून जर एखाद्या व्यक्तीने हात धुतले नाहीत आणि त्याच हाताने डोळा, नाक किंवा तोंडाला स्पर्श केला, तर त्याला संसर्ग होण्याची शक्यता असते. Live Science यापूर्वीही भीती व्यक्त केली आहे.या नवीन कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी आरॊह्य अधिकाऱ्यांनी लोकांना आजारी असलेल्या लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. फेस मास्क लोकांना व्हायरसपासून वाचवायला प्रभावी नसून जर लोकं अगोदरच आजारी असतील तर त्यांनी फेस मास्क लावणे जास्त गरजेचे आहे.
पहिल्यापासून आजारी असलेल्या व्यक्तीला फेस मास्क लावून इतरांना कफ आणि खोकल्याच्या ड्रॉपलेट्स वाचवू शकते. अमेरिकेतील वँडरबिल्ट युनिव्हर्सिटीमधील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ विल्यम शेफनर यांनी लाइव्ह सायन्सला सांगितले की, आजारी पडल्यावर फेस मास्क घालून बाहेर जाण्यापेक्षा घरीच राहणे चांगले. सीडीसीने लोकांना आपले डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करण्यापासून वाचायला सांगितले आहे. सतत हात धुणे, जवळजवळ २० सेकंदनंतर हात धुणे आणि ६० ते ९५ टक्क्यापर्यंत अल्कोहोल असलेले हॅन्ड सॅनिटाइजरने व्हायरसला मारले जाऊ शकते.