नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फ्लिपकार्टचे सह-संस्थापक सचिन बन्सल यांच्यावर त्यांच्या पत्नीने हुंडा घेण्यासाठी छळ केल्याचा आरोप लावला आहे. सचिन बन्सल यांची पत्नी प्रिया यांनी बेंगुळुरुच्या कोरमंगला पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळ केल्याचा एफआयआर दाखल केली आहे. दाखल केलेल्या एफआयआरमध्ये चार लोकांची म्हणजे सचिन बन्सल, त्यांच्या वडील सतप्रकाश अग्रवाल, आई किरण बन्सल आणि भाऊ नितीन बन्सल यांची नावे आहेत.
२००८ मध्ये झाले होते लग्न
सचिन आणि प्रिया यांचे लग्न २००८ मध्ये झाले असताना आपल्या तक्रारीत प्रिया यांनी आरोप लावला आहे की, लग्नानंतर सचिन आणि त्यांच्या कुटुंबाने हुंडा मागणे सुरु केले होते. २८ फेब्रुवारी पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत ३५ वर्षीय प्रिया यांनी आरोप लावला आहे की, त्यांच्या वडिलांनी लग्नासाठी ५० लाख रु. खर्च केले होते आणि सचिनला ११ लाख रु. कॅश दिले होते. पण कोर्टात रेकॉर्डमध्ये सचिन बन्सल यांची आई किरण बन्सल यांनी आपल्या सुनेविरुद्ध काही आठवडे अगोदर गुन्हा दाखल केला होता. ज्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बहिणीसोबत लैंगिक छळ- बन्सलची पत्नी
सचिनची पत्नी प्रिया व्यवसायाने दंतचिकित्सक असून सचिनने तिच्यावर मारहाण केली आणि पैशांची मागणी केल्याचा आरोप केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सचिनने मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला असून सर्व मालमत्ता सचिनच्या नावावर करायला सांगितली. सचिन दिल्लीला गेले तेव्हा आपल्या बहिणीचा लैंगिक छळ केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. प्रिया यांनी आरोप केला आहे की, जेव्हा मालमत्ता सचिनकडे हस्तांतरित करण्यास नकार दिला तेव्हा सचिनने तिच्या आई-वडिलांना आणि भावालाही त्रास दिला.
सचिन बन्सल यांच्या जामिनावर आज होणार निर्णय
प्रिया यांनी सचिन यांच्या विरोधात कलम ४९८ ए (हुंड्यासाठी छळ), ३४ (गुन्हेगारीचे हेतू) आणि हुंडा निषिद्ध कायद्याच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत एक एफआरआय दाखल केली आहे. तर सचिन बन्सल यांनी २९ फेब्रुवारीला जामीनसाठी अर्ज दिला असून आज गुरुवारी त्यांच्या याचिकेवर निर्णय सुनावणी होणार आहे.