मेष
दिवस उत्तम फलदायक आहे. नवीन लोकांची भेट होईल, ज्यामुळे लाभ होऊ शकतो. धनलाभ होईल. करियरमध्ये प्रगतीचा योग. सायंकाळी कुटुंबासह मजामस्ती कराल. नोकरीत मनासारखे वातावरण राहील. प्रापर्टीमधील गुंतवणुकीत भावाच्या माध्यमातून यश मिळेल.
वृषभ
शत्रूंपासून सावध रहा, त्रास देण्याचा प्रयत्न करतील. कोणत्याही प्रकारे धनहानी होऊ शकते, यासाठी सावध रहा. कार्यक्षेत्रात स्थिती नुकसानदायक असेल. दुसर्यांच्या भरोशावर काम सोडू नका. प्रेमसंबंधात मुधरता राहील. कुटुंबात तणाव असेल रागावर नियंत्रण ठेवा. वाणीवर नियंत्रण ठेवा. नात्यात दुरावा येऊ शकतो.
मिथुन
दिवस संमिश्र आहे. व्यवसायासाठी केलेला प्रवास लाभाचा ठरेल. पैशाच्या बाबतीत अस्वस्थ होऊ नका, भरपूर धनलाभ होईल. कुणाचेही ऐकून काम थांबवू नका, प्रगतीला खीळ बसेल. ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून लाभ होईल. संततीचे चांगले काम पाहून मन आनंदी होईल. आई-वडीलांची सेवा कराल.
कर्क
संमिश्र परिणामांचा दिवस आहे. विवाहाचे उत्तम प्रस्ताव येतील. समाजसेवेत अनेक संधी मिळतील. कौटुंबिक बिझनेसमध्ये प्रगती होईल. घरात शांतता राहील. व्यापारी वर्ग नवीन उत्पादनांचा समावेश करू शकतात. विद्यार्थ्यांना यश मिळेल. सासरकडील व्यक्तीला उधार देऊ नका, पैसे परत मिळणार नाहीत.
सिंह
प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. व्यापारात प्रयत्न यशस्वी होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. व्यस्तता असली तरी काम आणि कुटुंबात संतुलन ठेवा. बहिण-भावाशी चांगले संबंध राहतील. कलाशिक्षणात नवीन संधी मिळेल. नोकरीत सहकार्यांबाबत मृदू रहाल, चुक झाली तरी माफ करू शकता.
कन्या
संमिश्र दिवस आहे. आळसामुळे व्यवसाय राम भरोसे राहील. लाभाच्या जवळ जाऊनही निराशा हाती येईल. मित्र आणि कुटुंबाबत जास्त चिंताग्रस्त रहाल. आपले काम सोडून दुसर्यांच्या अनावश्यक गोष्टीत वेळ घालवाल, वेळ वाया जाईल. व्यापारात दैनंदिन खर्च भागवण्या इतकाच लाभ होईल.
तुळ
दिवस व्यस्ततेत आणि धावपळीत जाईल. व्यवसायात दुसर्यांच्या भरोशावर राहू नका. आपल्या अटींवर राहून काम करा. आरोग्यात चढ-उतार होईल. डोळे किंवा कंबरेचा त्रास होऊ शकतो. कुटुंबातील समस्या मार्गी लावाल. वेळेच्या अगोदर काम केल्याने व्यापकता, तणाव वाढेल.
वृश्चिक
इतर दिवसांच्या तुलनेत आज आळस दिसेल. दिनचर्या संथ राहील. मोठ्या कालावधीपासून रखडलेली कामे अंगावर पडतील, जी पूर्ण करावीच लागतील. कार्यक्षेत्राकडे दुर्लक्ष केल्याने उत्पन्न जास्त होणार नाही, आर्थिक स्थिती कमजोर राहील. आईची तब्येत घसरू शकते, सावध रहा. संततीच्या विवाह प्रस्तावाला मंजूरी द्याल.
धनु
संमिश्र परिणामांचा दिवस आहे. खुप दिवसानंतर चांगली बातमी ऐकायला मिळेल. रखडलेले पैसे येतील. सायंकाळ मनोरंजनात घालवाल. घरात वाद टाळा. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च जास्त होईल. मित्र मदत करतील.
मकर
संमिश्र दिवस आहे. राजकारणात प्रभाव आणि क्षेत्र वाढेल. जोडीदाराला भेटवस्तू द्याल. एखादा आजार त्रास देत असेल तर आराम मिळेल. स्वभाव चिडचिडा राहिल्याने लोकांना त्रास होईल. तणाव राहील. व्यापारातील समस्या दूर होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. जुन्या कर्जातून मुक्त व्हाल.
कुंभ
दिवस त्रासदायक आहे. एखाद्या सदस्याशी वाद होऊ शकतो, वाणीवर नियंत्रण ठेवा. कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी थोडे पैसे खर्च कराल. व्यापारात सकारात्मक बदलामुळे लाभ मिळेल. प्रेमसंबंध वाढतील. भागीदारीच्या व्यापारासाठी दिवस उत्तम. परदेशात राहणार्या नातेवाईकाकडून शुभवार्ता समजेल.
मीन
दिवस उत्तम फलदायक आहे. वरिष्ठ व्यक्तीच्या मदतीने कायदेशीर काम पूर्ण होईल. यश मिळेल. आरोग्य सांभाळा. सायंकाळी सर्व कुटुंबासोबत वेळ घालवाल. मानसिक शांती मिळेल. नवीन व्यापरासाठी दिवस चांगला आहे. रोजगारातील सर्व समस्या दूर होतील.