बहुजननामा ऑनलाईन –
मेष
आजचा दिवस मध्यम फलदायक आहे. बिझनेससाठी एक नवीन कला शिकण्याची आवश्यता भासेल, कटुता गोडव्यात बदलण्याची कला असेल, ज्यामधून तुमच्या बिझनेसला नवी मजबूती मिळेल, जी आर्थिक स्थिती मजबूत करेल. संततीकडून एखादी निराशाजनक बातमी ऐकायला मिळू शकते, जी चिंता वाढवू शकते. अडकलेले एखादे काम सायंकाळी मार्गी लागू शकते, यासाठी प्रयत्न सुरू ठेवा. आज रात्री प्रियजनांबरोबर भेटीगाठीत व्यस्त रहाल.
वृष
आज वागण्यात शांतता आणि संतोष दोन्ही कायम ठेवावे लागेल, तेव्हाच कामे यशस्वी होतील. राजकारणात जे प्रयत्न केलेले आहेत, त्यामध्ये आज यश मिळेल. नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात नव्या करारांद्वारे प्रतिष्ठेत वाढ होईल. आज काही अप्रिय व्यक्तींना भेटण्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. संततीशी संबंधीत जर एखादी समस्या सुरू असेल, तर आज त्यामध्ये काही प्रमाणात दिलासा मिळेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत प्राप्त होतील.
मिथुन
आज सायंकाळी कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या मंगलकार्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभेल, ज्यामुळे मनशांती प्राप्त होईल. एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची भिती आहे. संततीला स्पर्धेमध्ये उत्तम यश मिळू शकते, ज्यामुळे मनात आनंदाची भावना असेल. व्यवसायात जोडीदाराची भरपूर साथ मिळेल.
कर्क
रोजगाराच्या क्षेत्रात काम करत असलेल्या जातकांसाठी आज दिवस उत्तम राहिल. कारण त्यांना रोजगारासंबंधी एखादी नवीन बातमी ऐकायला मिळेल. व्यापार आणि व्यवसायासाठी केलेला प्रवास सुखद आणि लाभदायक राहिल. जर एखाद्या संपत्तीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर दिवस उत्तम आहे. भाग्याची भरपूर साथ मिळेल. विद्यार्थ्यांनी परीक्षेत यशासाठी कठोर मेहनत करण्याची आवश्यकता आहे.
सिंह
आजचा दिवस धावपळीचा आहे. व्यवसाय आणि नोकरीत काही शत्रु आज डोकं वर काढू शकतात, परंतु ते आपसात भांडूनच संपतील. आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल कारण वाणीची सौम्यता आज विशेष सन्मान मिळवून देईल. सायंकाळच्या वेळी जोडीदाराच्या आरोग्यात घसरण येऊ शकते, ज्यामुळे धावपळ जास्त राहील. पैसे सुद्धा जास्त खर्च होतील. विद्यार्थी जर एखाद्या स्पर्धेत भाग घेणार असतील तर आजचा दिवस उत्तम आहे.
कन्या
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन येईल. रोजगार आणि नोकरीच्या क्षेत्रात सुरू असलेल्या प्रयत्नांना आज अल्पकालीन यश प्राप्त होईल. संततीकडून एखादी सुखद बातमी प्राप्त होईन. जर एखादा कायदेशीर वाद सुरू असेल तर आज त्यामध्ये विजय मिळेल. मंगल कार्यक्रमावर पैसेसुद्धा खर्च होतील. विद्यार्थ्यांना आज पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागेल.
तुळ
आजचा दिवस उत्तम राहिल. चारही बाजूचे वातावर आनंदी राहील. घरात सर्व सदस्यांचा आनंद वाढलेला दिसून येईल. अनेक दिवसांपासून सुरू असलेली व्यवहाराची समस्या सुद्धा आज संपेल. जवळच्या किंवा लांबच्या प्रवासाचा योग प्रबळ होईल, योग्य प्रमाणात पैसा हातात आल्याने प्रवासात आनंद मिळेल. मित्रांकडून आज मोठा लाभ होऊ शकतो. सायंकाळचा वेळ स्वादिष्ट पदार्थांचा ÷अस्वाद घेण्यात व्यतीत होईल.
वृश्चिक
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आहे. आज काही अंतर्गत रोग त्रास देऊ शकतात, जसे की, मल, मूत्र, रक्त इत्यादीची तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घ्या. कुटुंबात आज एखादा मंगल कार्यक्रम होऊ शकतो, ज्यामध्ये लहान मुले मौजमस्ती करतील. भागीदारीत एखादा व्यापार केला असेल तर तो उत्तम लाभदायक राहिल.
धनु
आजचा दिवस सामाजिक आणि राजकीय दृष्टीकोणातून चांगला आहे. आर्थिक कामावर सुद्धा काही पैसे खर्च होतील. आजचा दिवस रखडलेली कामे पूर्ण करण्याचा आहे, ज्यामुळे तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकता. सायंकाळी घरात पाहुण्यांचे आगमन होऊ शकते, ज्यामुळे घरातील लोक व्यस्त दिसून येतील.
मकर
आज आई-वडीलांची विशेष काळजी घ्या. कुटुंबात भांडण पुन्हा वर डोकं काढू शकते, ज्यामुळे नात्यात दरी निर्माण होऊ शकते. आज एखादी शुभ बातमी ऐकायला मिळेल. सायंकाळी नाराज झालेल्या जोडीदाराला समजवण्याचा पूर्ण प्रयत्न कराल. सासरच्या बाजूने धनलाभ होऊ शकतो. उपजिविकेच्या क्षेत्रात सुरू असलेले प्रयत्न यशस्वी होतील.
कुंभ
आज नोकरी आणि व्यवसायात कोणत्याही भांडणात किंवा वादात पडू नका, कारण हे नुकसानदायक होऊ शकते. शत्रु प्रबळ दिसतील. एखादी बातमी ऐकून अचानक प्रवासाला जावे लागेल. यासाठी सावध रहा. आरोग्याच्या बाबतीत सतर्क रहा. आर्थिक स्थिती सुदृढ होईल. सायंकाळचा वेळ धार्मिक कामात घालवाल.
मीन
आजचा दिवस संमिश्र आहे. मुलगा किंवा मुलीच्या विवाहाची चिंता सतावू शकते. जर सासरच्या बाजूच्या एखाद्या व्यक्तीशी पैशाचा व्यवहार करायचा असेल तर त्यासाठी वेळ चांगली नाही. यामुळे तुमच्या बंधुत्वात अंतर निर्माण होऊ शकते. दाम्पत्य जीवनात जर काही प्रतिकुलता असेल तर आज ती संपेल. एखादी मौल्यवान वस्तू चोरी होण्याची भिती आहे, यासाठी सावध रहा. धार्मिक क्षेत्रासाठी केलेला प्रवास यशदायक ठरेल.