बहुजननामा ऑनलाईन टीम : मेष – आजचा दिवस धावपळीचा आहे. कामात थोडी चिंता वाटेल, परंतु घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही कारण हा तुमचा भ्रम आहे. यापूर्वी केलेल्या कामाचे चांगले परिणाम आता मिळतील. स्थिती तुमच्या बाजूने उभी राहील. उत्पन्नही वाढेल. कार्यालयात सावध असले पाहिजे आणि लोकांशी वाद न घालता त्यांची मते ऐकण्यास प्राधान्य दिले पाहिजे.
वृषभ
आजचा दिवस अनुकूल आहे. भविष्यासाठी एखाद्या मोठ्या प्रवासाची योजना आखाल. घर किंवा दुकानाचे बांधकाम सुरू करण्याचा विचार कराल. मनात चांगल्या भावना असतील आणि खूप हलके वाटेल. लव्ह लाईफसाठी दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्ती अंत:करणातील गुपित तुम्हाला सांगेल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल आणि रोमँटिक वातावरण असेल. जोडीदाराशी जवळीक वाढेल.
मिथुन
आजचा दिवस धावपळीचा आहे. दिवसाची सुरुवात काहीशी कमजोर होईल. मानसिक ताणाचा परिणाम होईल. आरोग्यही थोडे कमजोर होऊ शकते. परंतु जसजसा दिवस वाढत जाईल बरे वाटेल. कामात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. उत्पन्न खूप चांगले होईल. सरकारी क्षेत्रात खूप चांगला फायदा मिळू शकतो.
कर्क
आजचा दिवस अनुकूल आहे. कमजोरी जाणवेल आणि एखाद्या कामाबद्दल चिंता वाटेल. शारीरिक दुर्बलता, थकवा जाणवेल. व्यवसायासाठी दिवस उत्तम आहे, परंतु जोडीदाराशी भांडण टाळा. लव्ह लाईफमध्ये रोमान्स असेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराची बिघडणारी तब्येत तुमची समस्या वाढवू शकते. कामात स्थिती मजबूत होईल. सल्ला घेऊनही काही कामे होतील, एखादी नवीन असाइनमेंट हातात येईल.
सिंह
आजचा दिवस अनुकूल आहे. जीवनात जी गोंधळाची स्थिती होती ती आता दूर होईल, स्थिती स्पष्ट होईल. उत्पन्न वाढेल. कामात यश मिळेल. कुटूंबाच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. समाजात आदर मिळेल. एखाद्या धार्मिक कार्यात योगदानाबद्दल तुम्हाला बक्षीस देण्याचा विचार केला जाईल.
कन्या
आजचा दिवस सामान्य आहे. महत्त्वाच्या कामात अडथळे आल्याने खुप अस्वस्थता वाटेल, यामुळे मानसिक चिंता वाढेल. जोडीदारावर लक्ष केंद्रित कराल, त्यांची काळजी घ्याल. यशस्वी आयुष्याचा आनंद लुटाल. प्रेमसंबंधात आज भांडणे टाळा. कामात तीक्ष्ण बुद्धी विजय मिळवून देईल. कामे सहजपणे हाताळाल. व्यवसायात तज्ञांचा सल्ला खूप उपयुक्त ठरेल.
तुळ
आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबाबद्दल खुप काही विचार कराल. संततीला प्रेम द्याल. वैवाहिक जीवनात स्थिती नियंत्रणात येईल. दोघांमधील समस्या कमी होतील. कुटुंबातील ज्येष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. त्यांच्याशी वाद घालू नका, त्यांचेही ऐका. कामात अलिप्त राहावे लागेल, अन्यथा काही अडचणी येऊ शकतात.
वृश्चिक
आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबात रममाण व्हाल, आणि कुटुंबात कुठे कुठे जास्त लक्ष द्यावे लागेल याची जाणीव होईल. गरजेनुसार घरगुती खर्चही कराल. उत्पन्न सामान्य होईल. खर्चावर नियंत्रण असेल. एखादा शासकीय फॉर्म भरता येईल. कुटूंबातील लहानांशी वादाची शक्यता आहे. अशा स्थितीपासून दूर राहीले पाहिजे. कामात प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीत चांगले परिणाम मिळतील. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीची साथ मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी महत्वपूर्ण गोष्टीवर चर्चा केल्यानंतर मार्ग निघेल. व्यवसायासाठी दिवस अनुकूल आहे.
धनु
आजचा दिवस अनुकूल आहे. आज प्रवास टाळा, कारण तो अनुकूल नाही. आज आरोग्यामध्ये काही प्रमाणात घसरण दिसून येईल. खाण्याकडे लक्ष द्या. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. समाधान वाटेल. कामात चांगले परिणाम मिळतील. समजूतदारपणा आणि कार्यक्षमता उपयोगात येईल. प्रेमसंबंधात तणावपूर्ण काळ असेल. प्रिय व्यक्ती रागाच्या मूडमध्ये असेल. जोडीदाराच्या हास्याने विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी असेल.
मकर
आजचा दिवस महत्तपूर्ण आहे कारण आज स्वतःकडे लक्ष द्याल. इच्छांना प्राधान्य द्याल आणि त्यासाठी प्रयत्न कराल. कामात खुप चांगले परिणाम मिळतील. नोकरी बदलण्याची विचार करू शकता. या दिशेने केलेले प्रयत्न प्रभावी ठरतील. प्रेमसंबंधात रोमान्सची संधी येईल. उत्पन्न सामान्य असेल, परंतु कुटुंबात सूख आणि शांतता असेल.
कुंभ
आजचा दिवस अनुकूल आहे. कामातील अडथळे दूर होतील. स्थिती सुधारेल. स्वतःवर अधिक विश्वास कराल. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबात आनंद राहील. घरात मनोरंजनासाठी वेळ घालवाल. संततीच्या बाबतीत निश्चिंत राहाल. वैवाहिक जीवन प्रेमपूर्ण राहील. प्रेमसंबंधात चांगल्या काळाची जाणीव होईल. प्रिय व्यक्तीला आनंदी ठेवण्यासाठी खूप प्रयत्न कराल, त्यांच्यासाठी एखादा सरप्राईज प्लॅन करू शकता.
मीन
आजचा दिवस अनुकूल आहे. उत्पन्न वाढेल आणि त्यातून आनंद मिळेल. खर्च वाढण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि आज मनसोक्त खर्च कराल. म्हणून सावधगिरी बाळगा. कारण पैसे वाचवणे ही चांगली सवय आहे. कामात चांगले परिणाम मिळतील. प्रेमसंबंधात काही अडचण येतील आणि प्रिय व्यक्तीला तुमची गरज भासेल. वैवाहिक जीवनासाठी चांगला दिवस आहे. जोडीदाराकडून गैरसमज दूर होतील.