मेष
आज उत्साहात दिसाल. प्रत्येक काम प्रामाणिकपणाने आणि योग्य वेळी पूर्ण कराल. कामाची आवड जरा जास्त असू शकते, म्हणून स्वत:ला वेळ देणार नाही. शारीरिक थकवा आरोग्यास त्रास देऊ शकतो. विवाहित लोकांनी जीवनासाठी आवश्यक असलेल्या विषयांवर जोडीदाराशी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रेमसंबंधात आज आनंदी राहाल आणि प्रिय व्यक्तीच्या मनात शिरण्याचा प्रयत्न कराल.
वृषभ
आज आत्मविश्वास भरपूर असेल. पैशांची चांगली आवक होईल. घरात लक्ष लागेल. काहीतरी खास पदार्थ खाण्याची इच्छा होईल. भाग्य प्रबळ असल्याने कामाच्या बाबतीत आश्वस्त असाल. ग्रहांची स्थिती तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवून उत्पन्न वाढवण्याचे संकेत देत आहे. आज पुढे होऊन मित्राला मदत कराल. विवाहित लोक तणावग्रस्त स्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील. प्रेमसंबंधात दिवसाचा पूर्णपणे आनंद घ्याल.
मिथुन
मनात चंचलता येईल, आणि जवळच्या लोकांना खुश करण्याचा प्रयत्न कराल. त्यांच्याबरोबर मजामस्ती कराल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीशी अनेक गोष्टी बोलू शकाल आणि वातावरण हलके ठेवाल. विवाहित लोक जीवनात आनंदी असतील. जोडीदाराचा सल्ला आणि विचार आवडतील, म्हणून आज जोडीदाराच्या नावाने नवीन काम सुरू करण्याचा प्रयत्न करा. कामाबद्दल गांभीर्य दर्शवाल आणि कार्यक्षमता सुधारण्यावर लक्ष केंद्रित कराल. प्रोत्साहन मिळेल. परंतु काही वैयक्तिक गोष्टी व्यावसायिक जीवनापासून दूर ठेवणे आवश्यक असेल.
कर्क
आज मन घराच्या बाहेर जास्त लागेल. सतत मनाला वाटेल की, घराबाहेर जावे. घरात राहण्याची इच्छा कमी होईल. यामागे इतर कोणतेही कारण नसेल. फक्त मन भरेल. घरातील लोक खूप प्रेम देतील. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीस समजण्यास काही अडचणी येतील. यामुळे गैरसमज होऊ शकतात. विवाहित लोक जीवनात प्रामाणिकपणाने पुढे जातील.
सिंह
आज प्रिय व्यक्तीला मनातील सर्व गोष्टी सांगाल आणि एका खर्या प्रियकराप्रमाणे प्रेम व्यक्त कराल. आज व्यवसाय करणारे लोक चांगला नफा मिळवतील. नोकरीत लाभ मिळू शकतो. कामात बुद्धीचा वापर कराल, जेणेकरून काम अगदी सहजपणे पूर्ण होईल. विवाहित लोक जीवनातील स्थितीबद्दल किंचित चिंतेत राहतील. प्रेमसंबंधात समाधानी व आनंदी राहाल. प्रिय व्यक्ती तुमच्या आनंदाची पूर्ण काळजी घेईल. आरोग्य चांगले राहील. मित्रांसमवेत वेळ घालवाल.
कन्या
आज कामात मन लागेल. बहुतेक वेळ कामात घालवाल. कुटूंबाला देखील महत्त्व द्याल. घरगुती खर्चाकडे अधिक लक्ष देऊन आवश्यक वस्तू आणू शकता. विवाहित लोक जीवनात वाढत्या तणावामुळे थोडे अस्वस्थ होऊ शकतात. प्रेमसंबंधात आनंदाने प्रिय व्यक्तीसोबत बाहेर जाण्याचा विचार कराल. मित्रांशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील.
तुळ
आज बुद्धीचा कामात पूर्ण वापर कराल. भाग्य प्रबळ राहील, ज्यामुळे कुठेतरी फिरायला जाण्याची स्थिती असेल. नोकरीत बदलाचे संकेत मिळत आहेत, म्हणून जर नोकरीत बदल करायचा असेल तर वेळ योग्य आहे. विवाहित लोक जीवनात संपूर्ण प्रेम आणि समर्पणानं जोडीदाराला स्वीकार करून जीवनातील समस्या एकमेकांना सांगितील. प्रेमसंबंधात आत कुटुंबातील सदस्यांना आपल्या प्रेमाबद्दल सांगाल आणि प्रेम स्वीकारण्याची विनंती कराल. खर्च वाढेल. मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कामात सहकार्यांचा पाठिंबा मिळेल.
वृश्चिक
मनातील अनेक गंभीर गोष्टीं असल्याने जास्त अस्वस्था दिसत आहे. आपल्या मनाची स्थिती किंवा संकटाबाबत मित्र किंवा एखाद्या विशेष व्यक्तीकडे व्यक्त व्हा. जेणेकरून मानसिक तणावातून मुक्त व्हाल आणि जीवनात पुढे जाऊ शकता. कामात व्यस्त असाल. खूप प्रयत्न करावे लागतील. आळशीपणापासून दूर रहाणे आवश्यक आहे. विवाहित जीवनात पूर्णपणे आनंदी असाल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीसोबत कशावरून तरी वाद होऊ शकतो. आरोग्य देखील कमजोर होऊ शकते.
धनु
तुमचे आरोग्य चांगले राहील. मनात चांगले विचार येतील. आजूबाजूच्या लोकांच्या कल्याणाबद्दल विचार कराल. मनात एखादा नवीन हेतू पूर्ण करण्याची इच्छा निर्माण होईल. उत्पन्नामध्ये चांगली वाढ होईल. खर्च कमी होईल. कामात चढ-उतारांचा सामना करावा लागेल. मनापासून जे काम करायची इच्छा होईल, त्यामध्ये अडथळा येऊ शकतो. विवाहित लोक जीवन आनंदी बनवतील. जोडीदाराचे मनापासून कौतुक कराल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीकडे एखादी मनातील इच्छा व्यक्त करू शकता.
मकर
एखादे मोठे काम हातात घेण्यासाठी दिवस चांगला नाही, म्हणून सावधगिरी बाळगा. खर्च वाढू शकतात. विरोधकांपासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. उत्पन्न कमी होईल. खर्च वेगवान होईल. धार्मिक कामात देखील खर्च होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात एखादी नवीन समस्या जाणवल्याने विवाहित लोक थोडे निराश होऊ शकतात. प्रेमसंबंधात खूप आनंदी राहाल. प्रिय व्यक्तीवर मनापासून प्रेम कराल. कामासाठी दिनमान खूप चांगले आहे. आरोग्यही चांगले राहील. मित्रांपासून एखादी गोष्ट लपवू शकता.
कुंभ
आजचा दिवस उत्तम आहे. लव्ह लाइफ आनंदी बनविण्यासाठी प्रयत्न करताना दिसाल. ग्रहांची कृपा देखील मदत करेल, ज्यामुळे नातेसंबंधात प्रेम वाढेल. विवाहित लोक जीवनाबद्दल खूप आशावादी असतील. जोडीदाराकडून चांगला पाठिंबा मिळेल. दोघेही एकत्र फिरायला जाऊ शकता. कामात बरेच प्रयत्न केल्यानंतर थोडेसे यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. मानसिक स्थिती प्रत्येकासमोर प्रकट करु नका.
मीन
आजचा दिवस कुटुंबाच्या नावावर कराल. आईबद्दल विशेष सहानुभूती असल्याने तिची सेवा करण्याचा प्रयत्न कराल. मनात त्यांच्यासाठी खुप प्रेम राहील. बहिण-भाऊ आज आपल्या वेगळ्याच मूडमध्ये दिसतील. उत्पन्न चांगले होईल. नोकारीत चांगले काम करून दाखवाल. मनात धार्मिक विचार येतील. विवाहित लोक जीवनात आनंदी असतील. प्रेमसंबंधात नात्यात पुढे जाऊ न शकल्याने निराश होऊ शकतात.