बहुजननामा ऑनलाईन – जर आपले दात चमकदार आणि पांढरे असतील तर आपण मनमोकळे हसू शकता आणि जर दात पिवळे झाले तर लोकांना हसणे अवघड होते. परंतु, काही घरगुती टिप्स अवलंबून दातातील पिवळसरपणा काढून टाकू शकतो.
१) स्ट्रॉबेरी
दोन ताज्या स्ट्रॉबेरी घ्या आणि त्याला चांगले बारीक करा. ब्रशच्या सहाय्याने दातांची २ ते ३ मिनिटे मालिश करा. आठवड्यातून दोनदा असे केल्याने दात पूर्णपणे पांढरे होतील.
२) बेकिंग सोडा
आपले दात उजळण्यासाठी आपण बेकिंग सोडा आणि लिंबू देखील वापरू शकता. १ चमचा बेकिंग सोडामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळा आणि बोटांच्या सहाय्याने २ ते ३ मिनिटे दातांवर चोळा. पिवळा थर स्वच्छ करून दात पूर्णपणे पांढरे होतील.
३) केळीचे साल
केळीच्या सालाच्या आतील भागानी दररोज १ ते २ मिनिटांसाठी दात घासा. यामुळे दात व्यवस्थित स्वच्छ होतील.
४) मोहरीचे तेल
मोहरीच्या तेलात एक चिमूटभर मीठ मिसळा आणि दातांवर मालिश करा. दात स्वच्छ होतील तसेच दात मजबूत होतील.
५) ॲपल सायडर व्हिनेगर
१ कप पाण्यात २ चमचे ॲपल सायडर व्हिनेगर घाला आणि २-३ सेकंद तसेच सोडा. नंतर त्याने गुळण्या करा. दररोज असे केल्याने दात पिवळसर होणे आणि तोंडाचा दुर्गंध दूर होईल.