मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून सांगितलं आहेत. ट्विटमध्ये त्यांनी संपर्कात् आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन केलं आहे. मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल असं देखील त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 5, 2021
कोरोना काळात देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कामाचा धडाका लावला होता. दौरे, कार्यक्रम आणि कोरोना योध्यांचा सन्मान करण्यासाठी ते अग्रेसर होते. दरम्यान, आज त्यांनी कोरोना चाचणी केली असून त्यामध्ये त्यांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यापुर्वी देखील राज्यातील अनेक दिग्गजांना कोरोना झाला होता. दरम्यान, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना देखील यापुर्वी कोरोनाचा झाला होता. उपचारानंतर ते ठीक झाले. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं सांगितलं आहे.