बहुजननामा ऑनलाईन टीम – भारताचे दिग्गज हॉकीपटू आणि तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता बलबीरसिंग सीनिअर यांचे सकाळी सव्वा सहा वाजता निधन झाले. बलबीर सिंग 95 वर्षांचे होते आणि सुमारे एक महिना त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्वास घेण्याचा त्राास होउ लागल्याने त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते.
Former hockey player from India, Balbir Singh Dosanjh, better known as Balbir Singh Sr, died in Chandigarh this morning. He was 95 and was battling multiple health issues for over two weeks. pic.twitter.com/YqJ0O3Bgc0
— Prasar Bharati News Services & Digital Platform (@PBNS_India) May 25, 2020
बलबीरसिंग सीनिअर यांना 8 मेरोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 18 मेपासून त्यांची प्रकृती बिकट होती, ताप आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. . मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयाचे अभिजीत सिंग यांनी बलबीरसिंग यांच्या मृत्यूची माहिती दिली.
बलबीरसिंग सीनिअर यांनी लंडन (1948), हेलसिंकी (1952) आणि मेलबर्न (1956) ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला तीन सुवर्णपदक मिळवून दिले. हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये नेदरलँड्सविरुद्ध 6-1ने जिंकलेल्या सामन्यात बलबीरसिंग यांनी पाच गोल केले होते. अद्याप हा विक्रम अबाधित आहे. ते 1975 च्या वर्ल्डकप जिंकणार्या भारतीय हॉकी संघाचे व्यवस्थापकही होते. बलबीरसिंग सिनिअर हे केवळ भारतच नव्हे तर जगातील दिग्गज खेळाडू होते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने निवडलेल्या आधुनिक ऑलिम्पिक इतिहासातील 16 महान ऑलिम्पियन खेळाडूंमध्ये बलबीर यांचा समावेश होता.