बहुजननामा ऑनलाइन टीम –
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोरोनामुक्त झाल्यानंतर जेव्ह घरी गेले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा अस्वस्थ वाटू लागलं होतं. यानंतर त्यांना पुन्हा एकदा दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांची प्रकृती सुधारली आहे. लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे असंही एम्स रुग्णालयाकडून कळवण्यात आलं आहे.
एम्सनं आज बुलेटीन काढत अमित शाह ठणठणीत बरे झाले असून त्यांच्यावर कोरोनापश्चात उपचार सुरू होते असं सांगितलं आहे. इतकंच नाही तर लवकरच त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याचंही सांगितलं आहे.
Home Minister Amit Shah has recovered and is likely to be discharged in a short time. He was admitted at AIIMS, New Delhi (on August 18) for post-COVID Care: AIIMS Delhi pic.twitter.com/9wIo4tg3r4
— ANI (@ANI) August 29, 2020
अमित शाह यांना 17 ऑगस्ट रोजी रात्री श्वास घ्यायला त्रास जाणवत होता. त्यामुळं त्यांना रात्रीच एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. 2 ऑगस्ट रोजी त्यांना कोरोना झाला होता. उपचारानंतर 14 ऑगस्टला त्यांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली होती.
शुक्रवारी कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्याचं ट्विट त्यांनी केलं होतं. ते म्हणाले होते की, माझा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. मी देवाचे आभार मानतो आणि माझ्या प्रकृतीसाठी ज्यांनी प्रार्थना केली आणि माझ्या कुटुंबाला धीर दिला त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आणखी काही दिवस मी होम आयसोलेशनमध्ये राहणार आहे.