पुणे :बहुजननामा ऑनलाइन – Heavy Rain |महाबळेश्वर, नवजा परिसरात अतिवृष्टी (Heavy rain) झाल्याने कोयना धरणा(Koyna Dam)त एकाच दिवसात साडेसहा टीएमसी इतका पाणीसाठा वाढला आहे़ धरणातील पाणीसाठा ६२ टक्क्यांवर गेला असून धरणात पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे धरणातून नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. उरमोडी आणि कण्हेर धरण (Urmodi and Kanher dams) परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस (Heavy Rain) झाला असून आज दुपारपासून धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.
कोयना धरणावर (Koyana Dam) गेल्या २४ तासात ३४७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर ४२४, नवजा ४२७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मागील १२ तासात ६.४७ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. धरणाची पाणी पातळी ७ फुटाहून अधिक वाढली आहे. याचबरोबर येत्या काही दिवसात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) व्यक्त केला आहे. त्यामुळे कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उरमोडी धरणात (Urmodi Dam) ६२ टक्के पाणीसाठा झाला असून गेल्या २४ तासात १०४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने आज दुपारनंतर धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.
कण्हेर धरत (Kanher dam) परिसरात ९२ मिमी पावसाची नोंद झाली असून धरणात ६० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणातून ५ हजार क्युसेक पाणी नदीत सोडण्यात येणार आहे.
कृष्णा खोर्यातील सर्व धरण परिसरात मुसळधार पाऊस (Heavy rain) झाला आहे. धोम
बलकवडी ३१० मिमी, तुळशी २३४ मिमी, राधानगरी १९४, धोम १६८ मिमी, वारणावती १८५ मिमी,
दुधगंगा ११७ मिमी, कासारी २५६ मिमी, पाटगाव १८३, तारळी २३३ मिमी पावसाची नोंद गेल्या २४ तासात झाली आहे.
web title: Heavy Rain | Koyna, Urmodi dam to release water into the river; In the last 12 hours, the water storage in Koyna Dam has increased by six and a half TMC
Cloudburst in Tamhini | ‘ताम्हिणी’त 24 तासात 486 मिमी पावसाची नोंद; पानशेत, टेमघर परिसरात मुसळधार
China | चीनमध्ये आला भयंकर पूर, छातीपर्यंत पाणी भरलेल्या मेट्रोमध्ये अडकले प्रवाशी
Parambir Singh | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 24 लाखांचे भाडे थकवले, कारवाईची शक्यता