बहुजननामा ऑनलाइन – बहुतांश लोकांच्या दिवसाची सुरूवात चहा आणि कॉफीने(coffee )होते. काही लोक तर चहा आणि कॉफीचे(coffee )शौकीन असतात. चहा अथवा कॉफी प्यायल्याने शरीरात उत्साह जाणवतो, असे त्यांचे म्हणणे असते. यासाठी हे लोक दिवभरात अनेक कप सेवन करतात. जर तुम्हाला सुद्धा कॉफीची अशीच सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. ब्रिटीश जर्नल ऑफ न्युट्रीशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिसर्चमध्ये खुलासा करण्यात आला आहे की, दिवसाची सुरूवात कॉफीने करणार्यांना डायबिटीजचा धोका जास्त असतो. या रिसर्चमध्ये काय म्हटले आहे ते जाणून घेवूयात…
रिसर्चमध्ये म्हटले आहे की, सकाळी उठताच कॉफी प्यायल्याने डायबिटीजचा धोका वाढू शकतो. यासाठी संशोधकांनी 29 निरोगी पुरूष आणि महिलांवर परीक्षण केले, ज्यांना तीन गटात विभागण्यात आले. यादरम्यान, पहिल्या गटाला रात्री चांगली झोप दिली आणि सकाळी गोड पाणी पिण्यास दिले.
दुसर्या गटातील सदस्यांच्या झोपेत अडथळे निर्माण करण्यात आले. तर सकाळी त्यांनाही गोड पाणी देण्यात आले. तर तिसर्या गटाच्या सदस्यांना सलग झोप देण्यात आली. मात्र, त्यांना सकाळी उठताच गोड पाण्यापूर्वी ब्लॅक कॉफी पिण्यासाठी देण्यात आली.
यानंतर सर्व सहभागी व्यक्तींच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. या परिणामानुसार, जर रात्री झोप चांगली आली नाही तर याचा मेटाबॉलिज्मवर मर्यादित परिणाम पडतो. तर सकाळी नाश्ता करण्यापूर्वी कॉफी प्यायल्याने ब्लड शुगरवर नकारात्मक परिणाम पडतो.