चंडीगढ : वृत्तसंस्था – हरियाणा सरकारचे गृहमंत्री अनिल विज यांनी स्वत: सांगितले की, कोरोनाची व्हॅक्सीन घेऊनही ते कसे कोरोना पॉझिटिव्ह झाले. अनिल विज म्हणाले, डॉक्टरांनी त्यांना अगोदरच सांगितले होते की, व्हॅक्सीनचा दूसरा डोस देण्याच्या 14 दिवसानंतरच शरीरात अँटीबॉडीज तयार होईल. यानंतरच कोरोनापासून त्यांचे रक्षण होऊ शकते. अनिल विज यांनी म्हटले की, त्यांना उपचारानंतर आता बरे वाटत आहे.
20 नोव्हेंबरला अनिल विज यांनी कोरोनाची व्हॅक्सीन कोवॅक्सीन घेतली होती. 5 डिसेंबरला त्यांनी ट्विट केले की, ते व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.
अगोदर कोरोना व्हॅक्सीन घेऊनही अनिल विज कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची बातमी वार्यासारखी सर्वत्र पसरली. या प्रकरणात आरोग्य मंत्रालयाला स्पष्टीकरण द्यावे लागले. अनिल विज यांना भारत बायोटेक आणि आयसीएमआरकडून विकसित करण्यात येत असलेल्या कोव्हॅक्सीनचा डोस देण्यात आला होता.
आता स्वत: हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, कोरोनाचा दूसरा डोस अगोदरच्या डोसच्या 28 दिवसानंतर दिला जातो आणि 14 दिवसानंतर शरीरात अँटीबॉडिज डेव्हलप होते. तेव्हाच कोरोनपासून संरक्षण मिळू शकते. म्हणजे या प्रक्रियेत 42 ते 45 दिवसांचा वेळ लागतो. या दरम्यान व्हॅक्सीनने कुणीही सुरक्षित नाही.
याच कारणामुळे 20 नोव्हेंबरला कोरोना व्हॅक्सीन घेतल्यानंतर 5 डिसेंबरला अनिल विज कोरोना पॉझिटिव्ह झाले होते.
अनिल विज यांनी म्हटले की, व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा ते काळजी घेत होते, तरीही कोरोनाची लागण झाली. त्यांनी सांगितले की, त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहे आणि ते आता ठिक आहेत.