इंदापूर : बहुजननामा ऑनलाईन – इंदापूर मतदार संघातून भाजपाने माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा ३८१७ मतांनी पराभव झाला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीने दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी दिली होती. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता.
जागावाटपाविषयी राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या मतभेदांमुळे हर्षवर्धन पाटील यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. हर्षवर्धन पाटील यांनी 3 वेळा अपक्ष म्हणून निवडून येण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी एकूण ६ मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून पाटील यांनी सलग ४ वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. अखेर इंदापूरमधून हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला.