इंदापूर प्रतिनिधी : सुधाकर बोराटे – सौदी अरेबियातील हज यात्रेसाठी इंदापुर तालुक्यातून जाणाऱ्या ९ मुस्लिम बांधवांना राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी इंदापूर येथील भाग्यश्री निवासस्थानी शुभेच्छा दिल्या.यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी या सर्वांचा सत्कार करून सन्मान केला.
आघाडी सरकार असताना तात्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हज कमिटी स्थापन करून खास विमानाची व्यवस्था व सवलती हज यात्रेकरूंसाठी उपलब्ध करून दिल्या.त्यांच्यासाठी हजयात्रा मदत सेल सुरू केला होता,अशी आठवण यावेळी चर्चेदरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी सांगितली.
याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते हामजुभाई सय्यद,आशाबी सय्यद,हाजी गुलामनबी बागवान,समीर मुलाणी, सुग्रीबी मुलाणी,समीना मुलाणी,रमजान जमादार,समीर जमादार,हमीदबी जमादार या हाज यात्रेला चाललेल्या ९ मुस्लिम बांधव व भगिनींचा सत्कार करण्यात आला.
हज यात्रा ही मुस्लिम धर्मियांमध्ये अनिवार्य असून धर्माने सांगितलेल्या पाच तत्वांपैकी एक आहे. मुस्लिम धर्म जगात शांतता व मानवतेचा संदेश देणारा धर्म आहे.मक्का व मदिना या धार्मिक स्थळांचे दर्शन घेतल्यामुळे आत्मिक शक्ती वाढते व सर्वधर्म समभावाची शिकवण मिळते, असे याप्रसंगी मुस्लिम बांधवांनी नमूद केले.हज यात्रेसाठी हे मुस्लिम बांधव इंदापूर तालुक्यातून सोमवारी रवाना होणार आहेत.