मुंबई बहुजननामा टीम – सुहास गोखले यांना मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या रिपोर्टमधून क्लीनचीट देण्यात आल्या नंतर सुहास गोखले यांचा मुलगा साकेत गोखले यांनी मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र लिहिले आहे. सुहास गोखलेंवर बेबी पाटणकरशी संबंध असल्याचा आरोप झाला होता.
या प्रकरणात सुहास गोखले समवेत सुधाकर सारंग, गौतम गायकवाड, यशवंत पराटे, आणि ज्योतिराम माने यांच्यावरही आरोप झाले होते. मात्र या सगळ्यांना आरोपातून दोष मुक्त करण्यात आले. या नंतर साकेत गोखले यांनी ट्विटरवर या प्रकरणात भाष्य करत निर्दोष सुटलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची सरकारने माफी मागितली पाहिजे. मुख्यमंत्री हे राज्याचे गृहमंत्री देखील आहेत. त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या वडिलांची माफी अथवा दिलगिरी व्यक्त करावी अशी अपेक्षा ठेऊ शकतो का ? असे सुहासने ट्विट केले आहे.
Open letter to CM @Dev_Fadnavis,
After persecuting my innocent police officer father, the least ur govt. can do is apologize for it. You are also the Home Minister of the state. Will my dad even hear a word of sympathy or apology from you? (1/8)
— Saket Gokhale (@SaketGokhale) July 27, 2019
काय होते प्रकरण
२०१५ मध्ये बेबी पाटणकरशी संबंध सुहास गोखले आणि त्यांच्या सहकारी पोलिसांवर असल्याचा आरोप झाला होता. त्यांच्यावर बेबी पाटणकरशी आर्थिक व्यवहार करून त्याला पळून जाण्यास मदत केली असल्याचा आरोप होता. सत्र न्यायालयाने या प्रकरणी पोलिसांना क्लीनचीट दिली आहे.
सुहास गोखले यांनीही याआधी ही सांगितले होते की, मी पोलीस आहे मात्र पोलिसांनीच माझे आयुष्य बरबाद केले आहे. न्यायासाठी सुहास यांना चार वर्षे लढाई लढावी लागली होती. सुहास गोखले हे १ ऑगस्टपासून उपोषण करत होते. याबाबाबत १४ जुलैला त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कळविले होते. सुहास गोखले यांना २९ मे २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. सुहास गोखले हे ३१ मे रोजी निवृत्त होणार होते. मात्र या षडयंत्राखाली त्यांना फसविण्यात आले होते. कारण सुहास गोखले ते ड्रग्सविरोधी कायदा आणला गेला होता त्यात तेही सहभागी होते.
या सर्व प्रकरणानंतर सुहास गोखले यांची सुटका करण्यात आली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तुमच्याकडून माझ्या वडिलांना सहानुभूती मिळणार का ? त्यांनी गमावलेला मान- सन्मान त्यांना परत मिळणार का, असा प्रश्न साकेतनी उपस्थित केला आहे.